नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून जमीनदोस्त केले जाते मात्र याच शहरातील बर्की चौक ...
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागातील रस्त्यावरील अतिक्रमण हटवून जमीनदोस्त केले जाते मात्र याच शहरातील बर्की चौक ते मन्यार गल्ली देगलूर नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात हात गाडी लावून अतिक्रमण केले आहे बर्की चौक ते देगलूर नाका हा रस्ता शंभर फुटाचा असून या रस्त्यावर जवळपास ९० फुटाचे हातगाड्याने रस्त्यावर अतिक्रमण केल्यामुळे अनेक वेळा या ठिकाणी वाहतुकीची मोठी कोंडी होत असते पण या भागातील जनतेला या रस्त्यावरील अतिक्रमणामुळे मोठ्या समस्येला सामोरे जावे लागत आहे कारण या रस्त्यावरून एक आठवणी मोटरसायकल देखील जात नाही एवढे अतिक्रमण या भागातील हातगाडे वाल्याने रस्त्यावर ठाण मांडून बसले आहे पण यावर महापालिका कुठलेही कारवाई करताना दिसत नाही केली तरी ती तातपुरती महापालिकेकडून कारवाई केली जाते दुसऱ्या दिवशी जैसे थे अतिक्रमण दिसत असते या ठिकाणी मोटार सायकल वरून देखील नागरिकांना जाता येत नाही जर कोणाला जाते वेळेस धक्का लागला तर अनेक वेळा या ठिकाणी जातीयवादी दंगली घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे कारण या ठिकाणी जुना भाग असल्यामुळे या भागातील जनतेला घराकडे जाण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागत आहे वाद विवाद आणि जातीवादी भांडण देखील अनेक वेळा या भागात होत असतात त्यामुळे महापालिकेने या भागातील तात्काळ अतिक्रमण काढून हा रस्ता मोकळा करावा एकीकडे महापालिकाचे अधिकारी म्हणतात नांदेड शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि रस्ते मोकळे करण्यासाठी आम्ही अतिक्रमण काढत आहोत पण बर्की चौक व मन्यार गल्ली देगलूर नाकाकडे जाणारा रस्ता हा १०० फुटाचा असून देखील वाहतुकीसाठी फक्त दहा फुटाचा रस्ता शिल्लक आहे मग या रस्त्यावर एवढे मोठे अतिक्रमण असताना महापालिकेच्या अधिकाऱ्यांना रस्त्यावरील अतिक्रमण दिसत नाही का ? असा प्रश्न जुन्या नांदेड शहरातील नागरिकांना पडला आहे त्यासाठी जुन्या नांदेड शहरातील बर्की चौक ते मन्यार गल्ली देगलूर नाक्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील तात्काळ अतिक्रमण हटवून रस्ता नागरिकांसाठी खुला करण्यात यावा अशा मागणीचे निवेदन महापालिकेचे आयुक्त साहेब यांना विक्रम पाटील बामणीकर शिवसेना उपशहर प्रमुख नांदेड दक्षिण यांनी एका लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे दिलेल्या निवेदनावर त्यांची स्वाक्षरी आहे

COMMENTS