नांदेड: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' (NEET) परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक ...
नांदेड: वैद्यकीय प्रवेशासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी 'नीट' (NEET) परीक्षा म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणारा एक नियोजित घोटाळा असल्याची घणाघाती टीका करत, एनएसयूआय (NSUI) च्या वतीने नांदेडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शने करण्यात आली. खा. रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली आणि एनएसयूआय जिल्हाध्यक्ष सुरज पाटील शिंदे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले.
आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:
शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा: पेपरफुटीची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा.
NTA बरखास्त करा: नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) ही विश्वासार्हता गमावून बसली असून ती तात्काळ रद्द करण्यात यावी.
राष्ट्रद्रोहाचा गुन्हा: पेपरफुटीच्या या गंभीर प्रकरणातील दोषींवर केवळ साधे गुन्हे न नोंदवता थेट राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा.
सखोल चौकशी: या संपूर्ण घोटाळ्याची निष्पक्षपातीपणे आणि सखोल चौकशी करण्यात यावी.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार घोषणाबाजी
गुरुवार, दि. १४ मे रोजी झालेल्या या आंदोलनादरम्यान एनएसयूआयच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार आणि परीक्षा मंडळाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी किरण पडलवार, डॉ. आदित्य सोंडारे, जगदीश पावडे, अजरोद्दीन शेख, शुद्धोधन सावंत, सय्यद वासे, आदर्श पावडे, दानिश नवाब, जयद कुरेशी, संदीप गोले यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते व विद्यार्थी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्यांना शासन जोपर्यंत धडा शिकवत नाही, तोपर्यंत एनएसयूआय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला.
हा निव्वळ अपघात नाही, तर कट!'
आंदोलनावेळी बोलताना सुरज पाटील शिंदे यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय परीक्षा मंडळावर (NTA) कडक शब्दांत प्रहार केला. राष्ट्रीय पातळीवर अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या परीक्षेचा पेपर फुटणे अशक्य असून, हा एक नियोजित कट असल्याचा आरोप त्यांनी केला. या पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान झाले असून, केंद्राच्या नाकर्तेपणामुळे गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
आंदोलकांच्या प्रमुख मागण्या:आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध नोंदवत जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश आहे:

COMMENTS