महाराजस्व शिबिराच्या माध्यमातून प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचतेय :डॉ. सचिन खल्लाळ

  वसरणी येथील महाराजस्व     शिबिरात १४७४ प्रमाणपत्रांचे वाटप* नांदेड दि.१४ मे:- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  समाधान शिबिराच्या माध्यमातू...

 

वसरणी येथील महाराजस्व     शिबिरात १४७४ प्रमाणपत्रांचे वाटप*

नांदेड दि.१४ मे:- छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  समाधान शिबिराच्या माध्यमातून प्रशासन सामान्य माणसापर्यंत पोहोचत आहे . जनतेच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात येत आहे ,असे मत नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनी व्यक्त केले. वसरणी महसूल मंडळ अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनेगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व  समाधान शिबिर आज 14 मे रोजी आयोजित करण्यात आले ,यावेळी   मार्गदर्शन करताना ते बोलत होते .या शिबिरात ८७१ सातबारा ,५९१ आठ अ चे उतारे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे  बारा लाभार्थी असे एकूण 1475 तर इतर विभागाकडून अनेक लाभार्थ्यांना लाभाचे कार्ड वितरित करण्यात आले.    डॉ. सचिन खल्लाळ म्हणाले की, महाराजस्व समाधान शिबिराच्या माध्यमातून नांदेड तालुक्यात जवळपास १० हजार लोकांपर्यंत पोहोचलो आहोत .लोकांच्या समस्या जाणून घेऊन त्याचे निराकरण करण्यात प्रशासन यशस्वी होत आहे ,असे ते यावेळी म्हणाले. यावेळी तहसीलदार संजय वारकड ,नायब तहसीलदार महसूल सुनील माचेवाड , स्वपनील दिघलवार,तालूका आरोग्य अधिकारी डाॅ.प्रविण मुंडे,वैदयकिय अधिकारी तुप्पा गुडपे, मंडळ कृषी अधिकारी सुनील सानप,धनेगावचे सरपंच पिंटू पाटील शिंदे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविकात नांदेडचे तहसीलदार संजय वारकड यांनी शासनाच्या सर्व योजनांचा लाभ एकाच ठिकाणी मिळावं, हा या  शिबिराचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले तसेच आतापर्यंत २२ हजार लोकांना विविध प्रमाणपत्र दिली असल्याचे ते म्हणाले. त्यांनी उपस्थितांना सविस्तर  मार्गदर्शन केले.
यावेळी विविध विभागाचे स्टॉल लावण्यात आले होते. त्यात प्रामुख्याने महसूल विभाग, निवडणुक विभाग ,विशेष सहाय्य विभाग,आरोग्य विभाग, कृषी विभाग, भूमी अभिलेख, नोंदणी विभाग, महावितरण ,आधार केंद्र ,आपले सरकार केंद्र, अनुलोम संस्था आदींचे स्टॉल लावण्यात आले होते. शिबिर यशस्वी करण्यासाठी वसरणी मंडळाचे मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन ,ग्राम महसूल अधिकारी आर .पी .मुंडे, संजय वानोळे, दीपक सोनटक्के आदींनी परिश्रम घेतले .यावेळी मंडळ अधिकारी प्रमोद बडवणे, संतोष  अस्कुळकर,श्रीकृष्ण येलमटे, ग्राम महसूल अधिकारी रमेश गिरी, मनोज सरपे, मारुती जमदाडे ,श्रीरामे यावेळी उपस्थित होते. तसेच विशेष सहाय्य विभागाचे श्रीमती प्रीतिका मुडगुलवार , संतोष वाघमारे, बालाजी सोनटक्के, गणेश वाघमारे ,प्रतीक्षा गायकवाड आदी उपस्थित होते. आधार व सेतू  केंद्राचे विजय जोंधळे ,नागनाथ स्वामी ,राजश्री मिरजकर तसेच अनुलोम सामाजिक संस्थेचे राम मुलांगे, पूजा  गोडघासे, सुषमा शिंदे, दिपाली भुसेवार आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आकाशवाणी नांदेड केंद्राच्या निवेदिका  राजश्री मिरजकर  यांनी तर आभार मंडळ अधिकारी सय्यद मोहसिन यांनी मानले.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group