माहूर:प्रतिनीधी राम दातीर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावरील प्रसिद्ध श्री रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला ...
माहूर:प्रतिनीधी राम दातीर साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या माहूर गडावरील प्रसिद्ध श्री रेणुका माता मंदिरात दर्शनासाठी आलेल्या एका महिला भाविकाची पर्स अज्ञात महिला चोरट्यांनी शिताफीने चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आज, १८ मे रोजी सकाळी ८:०० वाजण्याच्या सुमारास मुख्य गर्भगृहात (गाभाऱ्यात) हा प्रकार घडला. धक्काबुक्कीचा फायदा घेत चोरांनी तब्बल १ लाख ५९ हजार ६०० रुपयांच्या ऐवजावर हात साफ केला असून, या घटनेमुळे भाविकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.गर्दी आणि धक्काबुक्कीचा घेतला फायदापोलिस आणि प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, डोंबिवली (मुंबई) येथील रहिवासी असलेल्या उषा सुधाकर तायडे (वय ५९ वर्ष) या आपल्या नातेवाईकांसह माहूर गडावर दर्शनासाठी आल्या होत्या [
सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास त्या मुख्य गर्भगृहात दर्शन घेत असताना, पाठीमागून आलेल्या दोन अज्ञात महिलांनी दर्शनासाठी पुढे जाण्याच्या बहाण्याने मुद्दाम धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली [
याच गोंधळाचा फायदा घेऊन चोरांनी उषा तायडे यांच्या गळ्यात अडकवलेल्या पर्समधून ५९,६०० रुपयांची रोकड आणि दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण १,५९,६०० रुपयांचा मुद्देमाल अत्यंत शिताफीने चोरून नेला व साडीच्या पदराखाली लपवून पळ काढला
सुरक्षा रक्षक आणि मंदिर प्रशासनाचा हलगर्जीपणा?
हा प्रकार लक्षात येताच पीडित महिला आणि त्यांच्या मुलीने (सीमा अशोक पाटील) तात्काळ ओरडून तिथे उपस्थित असलेले सुरक्षा प्रमुख महादेव मुंडे यांना माहिती दिली [
परंतु, "सीसीटीव्ही ऑपरेटर आजारी आहे आणि तो एक तासाने येईल", असे सांगत मंदिर प्रशासनाने तातडीने मदत करण्यास नकार दिला, असा गंभीर आरोप पीडित महिलेच्या मुलीने केला आहे [ तब्बल दीड तासानंतर जेव्हा सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले, तेव्हा त्यात एक महिला साडीच्या पदराखाली पर्स लपवून पळून जाताना स्पष्ट दिसत होती
पोलीस प्रशासनाकडूनही संथ कारभार
फिर्यादी महिलांच्या म्हणण्यानुसार, मंदिर प्रशासनाने त्यांना ३ किलोमीटर अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यात जाण्यास सांगितले पोलीस ठाण्यात आल्यानंतरही त्यांना अनेक तास ताटकळत ठेवण्यात आले आणि दुपारी साडेबारा-पावणेएकच्या सुमारास त्यांच्या तक्रारीची प्रत हातामध्ये देण्यात आली
पोलिसांनी पाहिजे तसे सहकार्य केले नसल्याची खंत भाविकांनी व्यक्त केली आहे
तथापि, एका पीएसआय (PSI) अधिकाऱ्याने नंतर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासासाठी मंदिराकडे धाव घेतली आहे या प्रकरणाचा पुढील तपास माहूर पोलीस करत असून, गडावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे महिला चोरांचा शोध सुरू आहे.
.jpeg)

COMMENTS