नांदेड : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, निकालातील सावळागोंधळ आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आज स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया...
नांदेड : नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी, निकालातील सावळागोंधळ आणि शिक्षण क्षेत्रातील वाढत्या भ्रष्टाचाराविरोधात आज स्टुडंटस् फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) नांदेड जिल्हा कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी संतप्त विद्यार्थ्यांनी केंद्र सरकार आणि शिक्षण माफियांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. आंदोलनानंतर एसएफआयच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले.
या निवेदनात एसएफआयने आरोप केला आहे की, राष्ट्रीय परीक्षा एजन्सीने (एनटीए) नीट परीक्षेच्या गोपनीयतेचा पुरता खेळ खंडोबा केला असून वारंवार होणाऱ्या पेपरफुटीमुळे सामान्य कुटुंबातील गोरगरीब विद्यार्थ्यांच्या स्वप्नांची केंद्र सरकारने क्रूर थट्टा केली आहे. हा केवळ एक घोटाळा नसून प्रामाणिक विद्यार्थ्यांच्या कष्टाची दिवसाढवळ्या झालेली लूट आहे. या पार्श्वभूमीवर, देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या या गंभीर घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मुख्य मागणी संघटनेने केली आहे.
तसेच या संपूर्ण घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, पेपरफुटीच्या मुख्य सूत्रधारांना कठोर कायद्यांतर्गत जन्मठेपेची शिक्षा व्हावी आणि ज्या परीक्षा केंद्रांवरून हे गैरप्रकार झाले आहेत त्यांची मान्यता त्वरित रद्द करण्यात यावी, अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. जोपर्यंत परीक्षा प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता येत नाही तोपर्यंत दोषींवर कठोर कारवाई सुरूच राहावी, असेही निवेदनात नमूद केले आहे.
शिक्षण संस्थांच्या व्यापारीकरणामुळे आणि केंद्र व राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळे आज तरुण विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नैराश्य पसरले असून लाखो तरुणांचे भविष्य उद्ध्वस्त होण्याची भीती निर्माण झाली आहे. स्थानिक प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन आमच्या मागण्या तात्काळ केंद्र सरकारकडे पोहोचवाव्यात, अशी विनंती एसएफआयने केली आहे. या आंदोलनात नांदेड जिल्ह्यातील शेकडो विद्यार्थी आणि एसएफआय चे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

COMMENTS