नांदेड : महापालिका आणि पोलीस पथका मार्फत शहरातील फेरीवाल्याना टार्गेट करीत बेकायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. सीटू संलग्न नांदेड महानगर ...
नांदेड : महापालिका आणि पोलीस पथका मार्फत शहरातील फेरीवाल्याना टार्गेट करीत बेकायदेशीर कार्यवाही करण्यात येत आहे. सीटू संलग्न नांदेड महानगर हॉकर्स युनियनच्या वतीने यापूर्वी हजारोंचे मोर्चे काढून मनपाला राष्ट्रीय फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्यास सीटू कामगार संघटनेने भाग पाडले होते. तत्कालीन मनपा आयुक्त यांनी हॉकर्स झोन तयार करण्याचे आश्वासन संघटनेस दिले होते. परंतु लाभाच्या कार्यामध्ये व्यस्त असलेल्या मनपास कायदेशीर अंमलबजावणी करण्याचा विसर पडला असून मागील काही दिवसापासून शहरातील पथविक्रेते व फेरीवाल्याना शहरातून हुसकावून लावण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.
मोक्याचे भूखंड हडप करणाऱ्यावर व मोठ्या राजकीय पुढाऱ्यांनी केलेल्या अतिक्रमण धारकांवर कार्यवाही करण्याची हिम्मत मनपा मध्ये नाही. ९ मे रोजीच्या मेळाव्यात १८ मे रोजी महापालिकेवर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला होता. गांधी नगर, महावीर चौक, वजीराबाद, टिळक नगर, आंनद नगर, तरोडा नाका, श्री नगर येथे शाखा स्थापन करण्यात आल्या आहेत.
वरील सर्व शाखा अध्यक्ष सचिवांनी १८ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालय व मनपावर काढण्यात आलेल्या मोर्चा ची जोरदार तयारी करण्याचा संकल्प केला होता
कलामंदिर, डॉक्टर लाईन सह शहरातील मोक्याचे भूखंड हडप करणाऱ्यांना दिलासा देणाऱ्या व पदोन्नती, पूरग्रस्त निधी व यादी घोटाळा तसेच सफाई कामगार घोटाळा करणाऱ्या आणि फेरीवाल्याना नाहक बेकायदेशीररित्या त्रास देणाऱ्या मनपाचा पर्दाफाश केला असून ३ जून रोजी मुंबई मंत्रालयावर मोर्चा काढून नांदेड येथील हॉकर्स चे प्रश्न मांडणार आहे.- कॉ.गंगाधर गायकवाड, अध्यक्ष- नांदेड महानगर हॉकर्स युनियन संलग्न सीटूमोर्चाला सीटू राज्य सचिव कॉ. उज्वला पडलवार, राज्य कमिटी सभासद कॉ.करवंदा गायकवाड, अखिल भारतीय जनवादी महिला संघटनेच्या अध्यक्षा कॉ.लता गायकवाड, प्रगती बांधकाम कामगार संघटनेचे सचिव वसीम अब्दुल यांनी संबोधित केले तर मोर्चा चे नेतृत्व अध्यक्ष कॉ.गंगाधर गायकवाड, सचिव कॉ.जयराज गायकवाड, उपाध्यक्ष कॉ. मुकेश गर्दनमारे, वजीराबाद शाखेचे अध्यक्ष मोनू सिंग महाराज,सचिव शिवकुमार मिनके,उपाध्यक्ष प्रभावती नांदेडकर,नय्युम कासार,पंकज कांबळे, कॉ. मंगेश वट्टेवाड, कॉ. मुकेश गर्दनमारे, महेंद्र भटलाडे,कॉ.राहुल नरवाडे, कॉ.सुभाषचंद्र गजभारे,कॉ. मारोती केंद्रे,,सुनील पाटील, शशांक गायकवाड आदींची केले.
तळपत्या उन्हात फेरीवाले, पथविक्रेते, रस्त्याच्या कडेला छोटा व्यापार करणारे व्यापारी यांनी मोर्चात मोठ्या संख्येने सामील होऊन महापालिका व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना निवेदन देण्यात आले असून ३ मे ला मुबंई मंत्रालयावर मोर्चा काढण्यात येणार असून या मोर्चा मध्ये नांदेड येथील अनेक हॉकर्स सामील होणार आहेत अशी माहिती अध्यक्ष कॉ.गायकवाड यांनी दिली आहे.

COMMENTS