महाराष्ट्र राज्यातील तालुका न्याय शासकीय धान्य गोदामामध्ये काम करणारे कामगार महाराष्ट्र सुरक्षा रक्षक व माथाडी कामगार कृती समितीच्या नेतृत्वाखाली दिनांक २५ व २६ मे २०२६ रोजी राज्यभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करणार आहेत, अशी माहिती हिंद मजदूर सभा महाराष्ट्र कौन्सिलचे अध्यक्ष साथी निवृत्ती धुमाळ यांनी दिली. पुढे ते म्हणाले की, राज्यातील शासकीय धान्य गोदामामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जवळजवळ १० ते ११ हजार नोंदीत माथाडी कामगार काम करीत आहेत. या कामगारांना माथाडी कायदा लागू आहे. राज्य शासनाच्या अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने २४ एप्रिल २०२६ रोजी एक शासन निर्णय जाहीर केला असून, या शासन निर्णयाप्रमाणे शासनाने धान्य वितरणासाठी द्वारपोच योजना प्रणाली लागू केली आहे. यामुळे आता शासकीय धान्य गोदामामध्ये काम करत असणाऱ्या कामगारांना कामच मिळणार नाही. तसेच वाहतुकीच्या ट्रकवर उपलब्ध असणारे काम या शासकीय धान्य गोदामातील कामगारांना न देता त्या ठिकाणी वाहतूक ठेकेदारांना त्यांचे स्वतःचे कंत्राटी कामगार लावण्याची परवानगी या शासन निर्णयात देण्यात आलेली आहे. त्यामुळे राज्यातील १० ते ११ हजार कामगारांचा रोजगार जाणार आहे. त्यामुळे या कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांना उपासमारीला तोंड द्यावे लागेल. खरे तर शासन निर्णयाद्वारे कायद्याला हरताळ फासण्याची शासनाची कृती असून ठेकेदारांना बाहेरचे कामगार स्वस्तात लावण्याची परवानगी देणारे आहे. या बाबतीमध्ये कृती समिती आणि वेगवेगळ्या माथाडी कामगार संघटनांनी मा. कामगार मंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री यांना निवेदन देऊन कामगारांच्या व्यथा त्यांच्या समोर मांडलेल्या आहेत. मात्र अन्न नागरी पुरवठा मंत्री त्यांच्या कार्य भावल्याचे निमित्त करून या विषया संबंधित लावलेल्या मिटिंग सातत्याने पुढे ढकलत आहेत. त्यामुळे माथाडी कामगार त्यांच्या संघटना आणि माथाडी कृती समिती यांनी २५ व २६ मे रोजी राज्यव्यापी धरणे कार्यक्रम जाहीर केला आहे. याबाबतीत लवकरात लवकर तोडगा निघाला नाही आणि कार्यरत असणाऱ्या तालुका गोडाऊनमधील माथाडी कामगारांचे वेतन व काम सुरक्षित केले गेले नाही तर बेमुदत संप आणि तीव्र आंदोलन करण्याचा निर्धार कृती समितीच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे. आंदोलनाच्या बाबतीत पुढील निर्णय घेण्यासाठी माथाडी कामगारांचे नेते व माथाडी कृती समितीचे अध्यक्ष मा. नरेंद्र पाटील यांच्या अध्यक्षतेखाली २६ मे २०२६ रोजी ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियन कार्यालय, पी.डिमेलोभवन, कर्नाक बंदर, मुंबई येथे सर्व माथाडी कामगार नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती निवृत्ती धुमाळ यांनी दिली.
$type=grid$count=4$ico=1$cate=0$rm=0$sn=0=$hide=post$cm=0
[विशेष न्युज]$hide=post
/gi-clock-o/ Latest News$type=list$hide=post
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
RECENT WITH THUMBS$type=blogging$m=0$cate=0$sn=0$rm=0$c=4$va=0$hide=post
RECENT$type=list-tab$date=0$au=0$c=5$hide=post
REPLIES$type=list-tab$com=0$c=4$src=recent-comments$hide=post
RANDOM$type=list-tab$date=0$au=0$c=5$src=random-posts$hide=post
/gi-fire/ ONE WEEK POPULAR$type=one
-
* महाराष्ट्र राज्यात १९७२ च्या भीषण दुष्काळाच्या परिस्थितीवर मात करण्यासाठी आखण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून कै. वि.स. पागे यां...
-
नांदेड : नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स हायस्कूल येथे थोर समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ तथा मराठवाड्याच्या शैक्षणिक व सामाजिक विकासासाठी मो...
-
नांदेड दि. 22 - 'सोन्याची लंका' ह्या पुस्तकात लेखकाने श्रीलंकेतील निसर्गसौंदर्य, पर्यटनस्थळे, लोकजीवन आणि लोकसंस्कृतीचे यथातथ्य दर्श...
-
नांदेड: :विद्यार्थ्यांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि सुरक्षित रस्ते वापरण्याची सवय रुजविण्याच्या उद्देशाने नागर्जुना पब्लिक स्कूल, नांदेड ...
-
विशेष प्रतिनिधी, नांदेड नांदेड: मुदखेड तालुक्यातील आमदुरा येथील पुलावरून चारचाकी वाहन नदीपात्रात कोसळल्याच्या घटनेला आता एक अत्यंत धक्कादा...

COMMENTS