उमरी प्रतिनिधी श्रावण महिना जसा पवित्र आहे. तसाच अधिक महिना अती पवित्र आहे. या दोन्ही महिन्यात भगवंताचे चिंतन करावे. भगवंताच्या चिंतनाने आपल...
उमरी प्रतिनिधी
श्रावण महिना जसा पवित्र आहे. तसाच अधिक महिना अती पवित्र आहे. या दोन्ही महिन्यात भगवंताचे चिंतन करावे. भगवंताच्या चिंतनाने आपली चिंता दूर होते.शेवटचा क्षण आनंदात जावा असे वाटत असेल तर अध्यात्माशिवाय पर्याय नाही. अध्यात्म करीत असताना वयाची अट नाही, लहानपणापासून ते वयोवृद्ध आणि शेवटच्या क्षणापर्यंत कोणत्याही व्यक्तीला अध्यात्म करता येऊ शकते. असे प्रतिपादन महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार आचार्य स्वामी गजेंद्र चैतन्यजी महाराज यांनी केले.
उमरी शहरातील गोजे परिवाराच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यात ते बोलत होते.
या भागवत कथेची सांगता शनिवारी होणार असून रविवारी काल्याचे किर्तन व त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन केले आहे.
भागवत कथेच्या माध्यमातून समाज प्रबोधन करताना आचार्य गजेंद्र चैतन्यजी महाराज पुढे म्हणाले, पुण्य असल्याशिवाय भगवंताची कथा श्रवण करूच शकत नाही. संत वांडग्मयाचा आधार घेत परमपूज्य महाराजांनी अनेक कथा सारांश सांगितला. विद्यमान आणि वर्तमान या दोन सत्ता आहेत. श्रवण भक्ती ही सर्वश्रेष्ठ असून संतांची कथा श्रवण करावी.जीव रुपी समुद्राने कानरुपी कथा ऐकावी. रामचरित्र श्रीकृष्ण चरित्र सांगितले. भक्तासाठी देव प्रगट होतो. हे अनेक संतांच्या जीवन चरित्रात आढळले आहे. पंढरीची वारी ही सर्वश्रेष्ठ आहे. एकदा तरी वारी करावी असा सल्ला देत चांगला भक्त बनणे फार अवघड आहे. भक्ताला देव आवडतो पण भक्ताची व्याख्या कळाली पाहिजे. भक्ताची चिंता देव करतो. त्यासाठी तसा भक्त असला पाहिजे.भक्त कसा असावा हे अनेक चरिञ कथेतून
सांगितले. भविष्याची चिंता करू नये, वर्तमानातील प्रत्येक क्षण चांगला घालवायचा त्यासाठी वर्तमान बिघडू देऊ नका असेही सांगितले. गुरु हा सर्वश्रेष्ठ आहे गुरुनी भक्ताचा हात धरावा असे सांगताना गुरु आणि शिष्याचे महत्त्व पटवून सांगितले.
हार्मोनियम वादक दीपक मालवे, तबलावादक संदीप गवई, पॅड वादक भास्कर मोहोड, ऑर्गन वादक अंकित देशमुख, झाकी सजावट हेमराज काळे यांची संगीत साथ मिळत आहे.कै.गंगाधरराव गोजे, कै पुरभाजी गोजे यांच्या स्मरणार्थ आणि ग.भा. सविताबाई गंगाधरराव गोजे यांच्या प्रेरणेतून ही कथा होत आहे.यावेळी
दत्तात्रेय भुते, संतोष जवादे वाशिमकर, नागनाथ पेंडकर, कथेचे आयोजक बालाजी गोजे, लक्ष्मीकांत गोजे, गोविंद गोजे, इंडिया साऊंड सिस्टमचे मालक शेख अजीस, सुधीरभाऊ, गोपाल राठोड, दताञय वारेवार, बाबुराव गुंडेवाड, शिवाजी हेमके,नरेंद्र येरावार यांच्यासह अनेक शेकडो भाविक भक्तांची उपस्थिती कथेला आहे.
...............
.......

.jpeg)
COMMENTS