नांदेड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन नांदेड येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव...
नांदेड : भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन नांदेड येथिल जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार लक्ष्मणराव मारोतीराव भवरे कामारीकर यांचा गौरव करण्यात आला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून त्यांचे वंशज तथा,त्यांचे नातू, इंदू मिल स्मारकाचे प्रणेते, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते तसेच,रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष सुशील सुर्यवंशी, राज्य प्रवक्ते अविनाश शिंदे, नाशिकच्या दै.महासागरचे वृत्त संपादक सुधीर उमराळकर, निसर्गोपचार तज्ञ रावसाहेब घोडेस्वार,नाशिक मनपाच्या स्थायी समितीचे मा.सभापती संजय साबळे,दक्ष पोलीस टाईम्सचे संजय डोंगरे, भिमकन्या रिलस्टार आसावरी बर्वे आणि संयोजक तथा, संस्थेचे अध्यक्ष अनिल आठवले,सचिव मिलिंद कळवणकर,सुप्रसिद्ध निवेदिका तथा,पत्रकार आश्विनी पुरी आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी दि.२३ मे रोजी,समुद्र लाॅन्स,नाशिक येथे ज्ञानदिप सामाजिक विकास संस्था महाराष्ट्र च्यावतिने देशभरात विविध क्षेत्रांत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या मान्यवरांना भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.त्यात नांदेड जिल्ह्याचे सुपुत्र लक्ष्मणराव मारोतीराव भवरे कामारीकर यांचा त्यांच्या सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात केलेल्या उत्तुग योगदानाबद्दल समावेश आहे. आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक बांधिलकी जोपासीत जनसामान्यांचे प्रश्न परखडपणे प्रशासनासमोर मांडतांनाच भारतीय संविधानाचा प्रचार व प्रसार तसेच,वृक्षलागवड व संगोपन,पर्यावरणसमृद्धी आणि शैक्षणिक,सांस्कृतिक आदी क्षेत्रांसह सामाजिक कार्यातही त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असतो.नांदेड जिल्ह्यात पत्रकारिता क्षेत्रात व विविध सामाजिक संघटनात ते अग्रेसर असतात.त्यांच्या कार्य व कर्तव्यतत्परतेचा सन्मान म्हणून त्यांचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला.
लक्ष्मणराव मा.भवरे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
लक्ष्मणराव मा.भवरे यांना हा पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे सर्वस्तरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.
सर्वौच्च सन्मान - लक्ष्मण भवरे.
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या नांवे त्यांचे नातू आनंदराजजी आंबेडकर यांच्या हस्ते मिळालेला पुरस्कार आपण सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रात आजपर्यंत केलेल्या कार्याचा सर्वौच्च सन्मान व आगामी काळात प्रेरणा असल्याचे मत भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्राप्त लक्ष्मणराव मा.भवरे यांनी व्यक्त केले.

COMMENTS