मुदखेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात मुदखेड येथील महात्मा गा...
मुदखेड (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या इयत्ता दहावीच्या निकालात मुदखेड येथील महात्मा गांधी विद्यालयाची विद्यार्थिनी आस्था अनूप कलानी हिने आपल्या यशाची मोहोर उमटवली आहे. आस्थाने या परीक्षेत ९२.८०% गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले असून तिच्या या कामगिरीमुळे शाळेसह संपूर्ण परिसरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे
जिद्द आणि कष्टाचे फळ अभ्यासातील सातत्य, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर आस्थाने हे यश मिळविले आहे. दहावीच्या परीक्षेत तिने सर्व विषयांत उत्कृष्ट गुण मिळवत विद्यालयाच्या गुणवत्तेत मोठी भर घातली आहे. निकाल जाहीर होताच विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून शिक्षकांनीही तिचे विशेष कौतुक केले आहे.पालकांचे प्रोत्साहन आणि शिक्षकांचे मार्गदर्शन आस्था ही अनूप कलानी यांची कन्या आहे. आपल्या यशाबद्दल बोलताना तिने सांगितले की, या यशामागे आई-वडिलांचे प्रोत्साहन, शाळेतील शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि स्वतःची घेतलेली कठोर मेहनत अत्यंत महत्त्वाची ठरली आहे. भविष्यात उच्च शिक्षण घेऊन मोठे ध्येय गाठण्याची तिची प्रबळ इच्छा आहे.
मान्यवरांकडून अभिनंदन आस्थाच्या या यशाबद्दल हदगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी श्यामप्रसाद विजयप्रकाश लाहोटी, तिचे मित्रपरिवार तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी तिचे अभिनंदन केले असून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. तिच्या या यशामुळे कलानी परिवारासह मुदखेड शहराची मान अभिमानाने उंचावली आहे.

COMMENTS