लोहा /प्रतिनिधी बहुचर्चित व लोहा शहर वाशियांचे लक्ष वेधून घेतलेल्या लोहा नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी श्याम अण्णा पवार व शंकर वट्टमवार य...
बहुचर्चित व लोहा शहर वाशियांचे लक्ष वेधून घेतलेल्या लोहा नगर परिषदेच्या स्वीकृत सदस्य पदी श्याम अण्णा पवार व शंकर वट्टमवार यांची बिनविरोध निवड झाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,
लोहा नगरपरिषदेच्या नामनिर्देशित सदस्य नियुक्तीसाठी 1) मा. सह. सचिव महाराष्ट्र शासन, नगर विकास विभाग, मुंबई यांचे शासन परिपत्रक क्र. संकिर्ण-2016/प्र.क्र.466/नवि-20, दिनांक 21/12/2016, 2) मा. जिल्हाधिकारी, नांदेड यांचे आदेश जा.क्र. 2025 /नपाप्र/सानि/का-1/टे-3/सीआर-54, दिनांक 29/12/2025 व 3) शरद पवार अध्यक्ष
नगरपरिषद लोहा यांचे सर्वसाधारण सभा सुचना पत्र दिनांक 13/05/2026 अन्वये नगरपरिषद लोहा सभागृहात मा. शरद पवार पिठासीन अधिकारी तथा अध्यक्ष यांच्या अध्यक्षते खाली आज दिनांक 21/05/2026 रोजी सकाळी 11.30 वाजता संपन्न झाली
त्या अधिनियमानुसार देय असलेल्या दोन नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्ती प्रकरणी लोहा नगरपरिषद स्वीकृत सदस्य मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्या मार्फत पदनिर्देशित केलेले छाननी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कंधार यांचे पत्र क्र. 2026 / कार्यासन-2 / निवडणूक / सिआर / 855 दिनांक 20/05/2026 नुसार 1) श्री वट्टमवार शंकर व्यंकटराव, 2) श्री पवार श्यामराव बाळाजी नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी चे दोन नामनिर्देशित सदस्य पदासाठी पात्र असल्याचे कळविले आहे.
त्यानंतर नॅशनलिस्ट काँग्रेस पक्षाचे गटनेता श्री भास्कर धोंडीबा पवार, यांनी मा. पिठासीन अधिकारी नगरपरिषद लोहा यांच्याकडे पत्र क्र.2026 /कार्यासन-2/निवडणूक/सिआर/855 दिनांक 20/05/2026 नुसार मा. पदनिर्देशित अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कंधार यांचेकडे दोन नावे नामनिर्देशित पदासाठी प्रस्तावित करण्यात आली होती. छाननी अंती दोन्ही नावापैकी दोन्ही नावे वैध करण्यात आली.
त्यानुसार पिठासीन अधिकारी तथा नगर अध्यक्ष नगरपरिषद लोहा यांनी 1) श्री वट्टमवार 2) श्री पवार श्यामराव बाळाजी यांची नामनिर्देशित शंकर व्यंकटराव, सदस्य म्हणून निवड झाल्याचे घोषीत केले.


COMMENTS