नांदेड परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज, नांदेड येथील प्राचार्य पदाचा पदग्र...
नांदेड
परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी स्थापन केलेल्या नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स कॉलेज, नांदेड येथील प्राचार्य पदाचा पदग्रहण सोहळा महाविद्यालयाच्या आय.सी.टी.हॉलमध्ये शुक्रवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी नवनियुक्त प्राचार्य डॉ. विकास सुकाळे यांनी सर्वांच्या उपस्थितीत प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष सीए डॉ. प्रवीण पाटील होते. संस्थेच्या सचिव सौ. श्यामल पत्की, सहसचिव ॲड. प्रदीप नागापूरकर, प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर, सौ. सुधा सुकाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
अध्यक्षीय समारोपात सीए डॉ. प्रवीण पाटील म्हणाले की, पीपल्स कॉलेजच्या प्राचार्य पदाची गौरवशाली परंपरा आहे. महाविद्यालयाच्या इतिहासात प्रथमच अर्थशास्त्र विषयाचे प्राध्यापक प्राचार्यपदी विराजमान झाले आहेत. माजी अध्यक्ष डॉ. व्यंकटेश काब्दे यांनी संस्थेची ध्येय-धोरणे पुढे नेणाऱ्या व्यक्तीची निवड करण्याची जबाबदारी आमच्यावर सोपविली होती. डॉ. विकास सुकाळे यांच्या रूपाने पीपल्स कॉलेजमध्ये विकासपर्वाची सुरुवात होईल, याची खात्री आहे.
संस्था आणि प्राचार्य यांच्यातील सुसंवाद चांगला असेल तर शैक्षणिक विकास निश्चित घडतो. पीपल्स कॉलेज हे एकेकाळी सामाजिक, साहित्यिक आणि सांस्कृतिक चळवळीचे मराठवाड्यातील केंद्र होते. त्या परंपरेला नवसंजीवनी देण्याची अपेक्षा डॉ. सुकाळे यांच्या नेतृत्वाकडून आहे. महाविद्यालयाचा विकास म्हणजे संस्थेचा विकास असून, शैक्षणिक गुणवत्ता उंचावण्याच्या दिशेने ही विकासपर्वाची सुरूवात झाली आहे, असेही सीए डॉ. प्रवीण पाटील म्हणाले.
संस्थेच्या सचिव सौ. श्यामल पत्की यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, प्राचार्य पद हे सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेतृत्वाचे पद आहे. विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेची ध्येय-धोरणे आणि सामाजिक जबाबदारी या सर्वांचा विचार करून निर्णय घेणारी व्यक्ती प्राचार्य असावी. डॉ. सुकाळे यांच्या कार्यकाळात महाविद्यालयाची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच अधिक उंचावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी सहसचिव ॲड. प्रदीप नागपूरकर तसेच प्रभारी प्राचार्य डॉ. शिवशंकर भानेगावकर यांनीही नवनियुक्त प्राचार्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
प्राचार्य पद स्वीकारताना डॉ. विकास सुकाळे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, परमपूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांनी 1950 साली पीपल्स कॉलेजची स्थापना करताना संस्थेची ध्येय-उद्दिष्टे स्पष्ट केली होती. त्या विचारांना पुढे नेण्याचे काम करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल. पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्याधारित, रोजगाराभिमुख आणि डिजिटल सक्षम शिक्षणव्यवस्था विकसित करण्याचा माझा मानस आहे.
तसेच त्यांनी संस्था व विद्यापीठाच्या समितीने प्राचार्य पदाची जबाबदारी दिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमास सायन्स कॉलेजच्या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष दीपनाथ पत्की, कार्यकारिणी सदस्य प्रा. डॉ. एटी. शिंदे, उपप्राचार्य एकनाथ खिल्लारे, प्रा. विलास वडजे, राहुल गोरे, सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. लक्ष्मण शिंदे, पीपल्स हायस्कूलचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, माजी प्राचार्य डॉ. आरएम जाधव, प्रा. डॉ. बालाजी कोम्पलवार, कार्यालयीन अधीक्षक रोहिदास आडे, ग्रंथपाल संदीप गायकवाड यांच्यासह प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. भगवान जाधव यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. विशाल पतंगे यांनी केले.

COMMENTS