मुखेड प्रतिनिधी(विठ्ठल कल्याणपाड मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील एका आदिवासी मन्नेरवारलू समाजातील शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा सरकारी न...
मुखेड प्रतिनिधी(विठ्ठल कल्याणपाड मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील एका आदिवासी मन्नेरवारलू समाजातील शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा सरकारी नौकरी मिळवतो तेव्हा त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होतो. अशाच एका होतकरु शेतकरी पुत्राने जिद्द, चिकाटी व मेहनतीच्या जोरावर यश मिळविले आहे. प्राथमिक शिक्षण गावात व माध्यमिक शिक्षण उदगीर येथील सैनिक शाळेत पूर्ण करून लहानपणापासूनच अभ्यासाची आवड असलेल्या निखिल हणमंतराव कल्याणपाड ने मुंबई पोलिस भरती मध्ये यश मिळविले. अभ्यासाची आवड आणि पोलीस प्रशासनात नोकरी करण्याची इच्छा यामुळे निखिल ने आपले उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्या नंतर छत्रपती संभाजीनगर येथे राहून पोलीस भरतीच्या तयारीला सुरुवात केली. तयारीला सुरुवात केल्या नंतर अवघ्या दोन वर्षाच्या आतच मुंबई पोलीस येथे निखिल ची 2026 नुकतीच निवड झाली आहे. या यशाबद्दल निखिल चे सर्व स्तरातून अभिनंदन व कौतुक होत आहे.

COMMENTS