उत्सव संतांचा, कुंभमेळा वारकऱ्यांचा उपक्रम यशस्वीतेसाठी २६ एप्रिल रोजी नांदेड ला बैठक

  उमरी प्रतिनिधी उत्सव संताचा कुंभमेळा वारकऱ्यांचा हा उपक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून  भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, ११,००० ग्रंथराज...

 

उमरी प्रतिनिधी

उत्सव संताचा कुंभमेळा वारकऱ्यांचा हा उपक्रम नांदेड येथे आयोजित करण्यात आला असून 

भव्य दिव्य कीर्तन महोत्सव, ११,००० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण संतचरित्र कथा या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी २६ एप्रिल रोजी 

नियोजन बैठक आयोजित करण्यात आली आहे.

हा उत्सव ऐतिहासिक होण्यासाठी विविध समित्यांचे गठन करण्यात येणार असून, सर्वांना सेवा करण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. सदरील बैठक ही  श्री साई मंदिर,

गोरक्षण कवठा वसरणी, नांदेड

(गोदावरीच्या किनारी) सकाळी दहा वाजता होईल. या बैठकीला उपस्थित राहण्याचे आवाहन नांदेड उत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

उत्सव संतांच्या कुंभमेळा वारकऱ्यांचा हा कार्यक्रम मोदी ग्राउंड, नांदेड येथे होईल. यात 

 ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, किर्तन महोत्सव, संत चरित्र कथा आरंभ: १ जानेवारी २०२७ सांगता: ९ जानेवारी २०२७ पवित्र औचित्य:

 संत ज्ञानेश्वर महाराज – ७५० वे जन्म वर्ष, श्री संत गुरुगोविंद सिंह जी ३६१ वे जन्म वर्ष,संत नामदेव महाराज ६७५ वे समाधी वर्ष, संत जनाबाई ६७५ वे समाधी वर्ष, नारायण महाराज देहूकर ३७५ वे जन्म वर्ष, संत सावता महाराज ६७५ वे जन्म वर्ष,संत जनार्दन महाराज देशपांडे ४५० वे समाधी वर्ष,वेदांत केसरी रंगनाथ महाराज परभणीकर १३७ वे जन्म वर्ष,भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह,अखंड नामस्मरण, किर्तन महोत्सव,संत चरित्र कथा,

११,००० ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 

१ जानेवारी भव्य पालखी सोहळा निघेल पालखी मार्ग सांगवी ते राज कॉर्नर, वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, शिवाजीनगर, वजीराबाद, कवठा ते मोदी मैदान

विशेष आकर्षण ७५० पताका, ७५० तुळशी, ७५० कलश, ७५० विणेकरी, ७५० चोपदार, ७५० मृदंगाचार्य, ७५० फेटाधारी कीर्तनकार, ७५० टाळकरी,

रथामागे लाखो भाविक

चांदीच्या रथात  ज्ञानेश्वरी ग्रंथ, तुकाराम गाथा व एकनाथ महाराजांचे ग्रंथ असतील  

२ ते ८ जानेवारी २०२७ दैनंदिन कार्यक्रम पूढील प्रमाणे ३ ते ६ – काकड आरती, ६:३० ते १०:३० – ज्ञानेश्वरी पारायण, ८:०० – नाश्ता, १०:३० ते १२:३० – सकाळचे कीर्तन, १२:३० ते २ महाप्रसाद, २ ते ३ हरिपाठ, ३ ते ५:३० संत चरित्र कथा, ६ ते ८ सायंकाळचे कीर्तन, ८ ते ९ महाप्रसाद, ९ जानेवारी (सांगता दिवस), ११ ते १ – अमृतुल्य काल्याचे कीर्तन, त्यानंतर – पुरणपोळीचा महाप्रसाद (५ लाख भाविकांसाठी), महाराष्ट्र व उत्तर प्रदेशातील नामवंत संत-महात्म्यांची उपस्थिती राहणार आहे. हा भव्य दिव्य सोहळा नांदेड करांसाठी एक नवचैतन्याची नांदी ठरणार आहे अशी माहिती हभप ज्ञानेश भक्त महेश महाराज शेवाळकर यांनी दिली आहे

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group