मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यातील मौजे आंबुलगा (बु) येथील प्रतिष्ठित आदर्श राजकीय व्यक्तिमत्व कै. बळवंतराव पाटील अंबुलगेकर यांच्या 29 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त श्री शिवाजी बळवंतराव पाटील अंबुलगेकर यांनी दि. 2 रोजी वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त इतर कोणताही खर्च न करता जिल्हा परिषद केंद्र प्राथमिक शाळा आंबुलगा येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शालेय साहित्य खरेदी करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका यांना 5 हजार रुपयांचा धनादेश देऊन एक चांगला आदर्श सामाजिक क्षेत्रात घडवून आणला, तसेच विद्यार्थ्यांना अल्पउपहार खाऊ वाटप केले, यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवाजी पाटील अंबुलगेकर म्हणाले की माझे बाबा बळवंतराव पाटील त्यांचे संपूर्ण आयुष्य गोरगरिबांची मदत व समाज सेवा ह्यात झोकून दिले , त्यांनी त्यांचे पूर्ण आयुष्य केवळ गावचा विकास आणि गावाची शैक्षणिक प्रगती कशी अग्रगण्य राहील यासाठी अतोनात प्रयत्न केले, आज त्यांच्या 29 व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देणे हीच खरी त्यांना आदरांजली असे शिवाजी पाटील अंबुलगेकर यावेळी म्हणाले, यावेळी शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष मा. श्री माधव देशटवाड, अल्लाप्रसाद कांबळे, जि. प. कें. प्रा. शाळेचे मुख्याध्यापिका सौ. बिचकुंदे मॅडम, पुष्पलवार सर, भोसले सर, श्रीधर पाटील सर, राठोड सर, गोरे मॅडम, पाटील मॅडम, विठ्ठलराव कौरवाड , बालाजी कलेटवाड, विठ्ठलराव कल्याणपाड (पत्रकार) , बालाजी कदम, यादव अकुलवाड, संदीप गंदिगुडे, उमाकांत मोतेवार सर, शिवकुमार पाटील, श्रावण कांबळे, बालाजी चल्लावाड, बालाजी लोकुलवार,सतिश पाटील, शंकर पाटील, माधव कलेटवाड, निशांत ठक्के, कैलास ठक्के, पप्पू पाटीलसमवेत सर्व शिक्षक व शिक्षिका, गावातील प्रतिष्ठित नागरिक, विद्यार्थी यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पुष्पलवार सर यांनी केले तर यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका प्रयागबाई बिचकुंदे मॅडम यांनी अशा आदर्श सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले व बालाजी कलेटवाड यांनी कै. बळवंतराव पाटील यांच्या जीवनातील आदर्श कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितले शेवटी शाळेच्या वतीने सर्वांचे आभार भोसले सर यांनी मानले.

COMMENTS