मुंबई/महाड, दि. २० मार्च २०२६:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती ...
मुंबई/महाड, दि. २० मार्च २०२६:महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २० मार्च १९२७ रोजी महाडच्या चवदार तळ्याचा सत्याग्रह करून ऐतिहासिक क्रांती घडवली. या क्रांतीने विषमतेच्या साखळदंडात अडकलेल्या समाजाला समता आणि मानवी हक्कांची नवी दिशा दिली. या ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर, आज महाड येथे 'चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष' सोहळ्याचा अत्यंत दिमाखात शुभारंभ करण्यात आला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षावर्धन सपकाळ यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन झाले. यावेळी महात्मा गांधींचे पणतू आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुषार गांधी, सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन, काँग्रेसच्या एस.सी. विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
'समतेचे अमृत' गावोगावी पोहोचवा: हर्षवर्धन सपकाळ
कार्यक्रमात बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, "मनुवादी व्यवस्थेने केवळ समाजावरच नव्हे तर पाण्यावरही नियंत्रण मिळवले होते. डॉ. बाबासाहेबांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह करून सामाजिक न्यायाचा संदेश दिला. चवदार तळ्यातील पाणी हे केवळ पाणी नसून ते 'समतेचे अमृत' आहे. हे पाणी कलशात भरून प्रत्येक गावातील नदी, तलाव आणि धरणात सोडून समतेचा विचार सर्वदूर पोहोचवा."
यावेळी त्यांनी विद्यमान सत्ताधाऱ्यांवर टीका करताना म्हटले की, ज्या मनुवादी प्रवृत्तींनी सत्याग्रहानंतर तळ्याचे शुद्धीकरण केले होते, त्याच विचाराचा वारसा आजही बहुजन समाजाला हक्कांपासून वंचित ठेवत आहे.
संघाच्या विषारी विचारांना गाडून टाका: तुषार गांधी
तुषार गांधी यांनी आपल्या भाषणात रा.स्व. संघावर कडाडून टीका केली. ते म्हणाले, "लोकांमध्ये दुही निर्माण करून आपला विचार जिवंत ठेवणाऱ्या रा.स्व. संघाच्या विचाराला महाडच्या याच ऐतिहासिक भूमीत गाडून टाका. चवदार तळ्याची क्रांती ही लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाची लढाई आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता आदर्शावर चालणारा असून, या समतेच्या लढाईत आपण सर्वांनी एकत्र येणे काळाची गरज आहे."
महापुरुषांना जातीच्या चौकटीत बंद करू नका: उल्का महाजन
सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी खंत व्यक्त केली की, सत्याग्रहाच्या वेळी सर्व जातींचे लोक एकत्र होते, पण आज हा लढा केवळ एका विशिष्ट समाजापुरता मर्यादित केला जात आहे. "छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे नसून ते संपूर्ण समाजाचे आहेत. त्यांना जातीच्या चौकटीत बंद करण्याचे षडयंत्र हाणून पाडा," असे आवाहन त्यांनी केले.
पदयात्रा आणि जलपूजन
कार्यक्रमानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत सभागृहापासून चवदार तळ्यापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून चवदार तळ्यातील पाणी कलशात भरून घेण्यात आले. हे 'समता जल' आता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये नेले जाणार असून, शंभराव्या वर्षपूर्तीचा मुख्य कार्यक्रम अतिशय धडाक्यात साजरा करण्याचा संकल्प सिद्धार्थ हत्तीअंबिरे यांनी यावेळी सोडला.

COMMENTS