लोहा,(प्रतिनिधी) चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदू धर्माचे नुतन वर्ष हे गुढीपाडव्या पासून सुरू होत असल्याने हा शुभ मुहूर्त म्हणजे साडेतीन म...
लोहा,(प्रतिनिधी)
चैत्र शुक्ल प्रतिपदेला हिंदू धर्माचे नुतन वर्ष हे गुढीपाडव्या पासून सुरू होत असल्याने हा शुभ मुहूर्त म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो.सकाळी मुहूर्त वेळेनुसार
रोजी घरोघरी गुढी उभारल्यानंतर लोहा शहरातील समस्त आर्य वैश्य समाजातील पुरूष महिला युवक यांनी नववर्षाच्या आगळं वेगळं स्वागत करण्यासाठी नगरेश्वर मंदिरात एकत्र जमून सर्वांनी फेटे बांधून हाती ध्वज पताके घेऊन वाजत गाजत भव्य दिव्य अशी जल्लोषात भव्य दिव्य रॅली काढली.
हिंदू नववर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी दि.१९ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता नगरेश्वर मंदिरात दर्शन घेऊन तेथून भाजी मंडई, शिवकल्याण नगर, माऊली नगर परत नगरेश्वर मंदिर असे मार्गक्रमन करून आर्य वैश्य समाजाची भव्य दिव्य रॅली मोठ्या थाटामाटात संपन्न झाली. यावेळी रॅलीमध्ये सहभागी महिला पुरुष युवक सर्वजण पारंपरिक पोशाख घालून भगवा फेटा बांधून मुखे परमेश्वराचे नामस्मरण करत ढोल ताशा वाद्यांच्या गजरात पारंपारिक पद्धतीने मोठ्या थाटामाटात सहभागी झाले होते.
यावेळी आर्य वैश्य समाज कमिटीतील सर्व पदाधिकारी तसेच महिला, पुरुष, युवक यांनी मोठ्या संख्येने सहभागी होवून भव्य दिव्य रॅली संपन्न झाल्याबद्दल आर्य वैश्य समाज कमिटीचे अध्यक्ष दिनेश सावकार तेललवार यांनी संपूर्ण समाज बांधवांचे आभार मानले.

COMMENTS