मुरूम फक्त नावालाच शुल्क परवानगी उत्खनन मात्र लाखो ब्रास बिलोली प्रतिनिधी------------------ बिलोली : मोजे कोल्हेबोरगाव येथून रॉयल्टी च्या न...
मुरूम फक्त नावालाच शुल्क परवानगी उत्खनन मात्र लाखो ब्रास
बिलोली प्रतिनिधी------------------
बिलोली : मोजे कोल्हेबोरगाव येथून रॉयल्टी च्या नावाखाली जास्तीचा मुरूम उत्खनन मोठ्या प्रमाणावर अनियमितता होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. जी. जी. कन्स्ट्रक्शन या कंपनीकडून काही ब्रास मुरूम काढण्याची परवानगी असताना, प्रत्यक्षात शेकडो ब्रास अतिरिक्त उत्खनन केल्याची चर्चा आहे. अशा प्रकारामुळे शासनाचा लाखो या रुपयांचा महसूल बुडत असल्याचे सांगितले जात आहे.
गागलेगाव-कोल्हेबोरगाव तसेच काही अंशी पाचपिंपळी रोडच्या डांबरीकरणाचे काम मागील एक ते दीड वर्षांपासून सुरू आहे. या कामासाठी मोठ्या प्रमाणात मुरूम लागतो. सध्या गुढी पाडव्याच्या निमित्ताने काम बंद असल्याचे सांगितले जात असले, तरी यापूर्वी मोठ्या प्रमाणावर मुरूमाची वाहतूक सुरू असल्याचे स्थानिकांनी निदर्शनास आणले आहे. मात्र, संबंधित ठेकेदाराला नेमकी कोणत्या ठिकाणाहून मुरूम उत्खननाची परवानगी देण्यात
महसूल विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आली आहे, याची अधिकृत माहिती मिळत नाही. जर परवानगी नियमांनुसार दिली असेल, तर उत्खनन करताना नियम व अटींचे पालन का केले जात नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या संपूर्ण प्रकारात महसूल विभागाने अद्याप कोणतीही ठोस कारवाई न केल्यामुळे तहसीलदारांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

COMMENTS