नांदेड – पोदार प्रेप, नांदेड येथे किंडरगार्टन पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या...
नांदेड – पोदार प्रेप, नांदेड येथे किंडरगार्टन पदवीदान समारंभ मोठ्या उत्साहात आणि आनंददायी वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन शाळेच्या वतीने सुंदर नियोजनातून करण्यात आले.विद्यार्थ्यांनी आकर्षक रॅम्प वॉक, गाणी, नृत्य आणि विविध कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली.या समारंभात चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पदवीदान पोशाख परिधान करून प्रमाणपत्र स्वीकारले. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि आत्मविश्वास पाहून पालकांना अभिमान वाटला. या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांच्या बालपणाच्या आठवणींना उजाळा मिळाला तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आदरणीय प्राचार्या डॉ. मालिनी सेन मॅडम उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मिनी कुलकर्णी मॅडम यांनीही विद्यार्थ्यांचे कौतुक केले यावेळी ए.ओ. गोविंदसाई मकवाना व असिस्टंट ए.ओ. कु. प्रियांका वटार यांचे विशेष सहकार्य लाभले, त्याबद्दल शाळेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व ग्राउंड स्टाफ यांचे विशेष आभार मानण्यात आले. शेवटी आभार प्रदर्शन करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

COMMENTS