नांदेड: प्रतिनिधी शहरात आज ईद-उल-फितरचा उत्साह असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. नवीन नांदेड भागातील गोदावरी नदी...
नांदेड: प्रतिनिधी
शहरात आज ईद-उल-फितरचा उत्साह असतानाच एक अत्यंत धक्कादायक आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. नवीन नांदेड भागातील गोदावरी नदीवर असलेल्या वाजेगाव बंधाऱ्यावर एका चालत्या दुचाकीमध्ये भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत दुचाकीस्वार तरुण गंभीररीत्या भाजला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ९:२५ च्या सुमारास ईदची सार्वजनिक नमाज संपल्यानंतर एक युवक (MH 43 AA 9252) जुन्या नांदेडकडून वाजेगावकडे जाणाऱ्या बंधाऱ्याच्या रस्त्याने जात होता. बंधाऱ्याचा रस्ता पार करून वर चढत असतानाच अचानक त्याच्या दुचाकीमध्ये मोठा स्फोट झाला. स्फोट इतका भीषण होता की दुचाकीने तत्काळ पेट घेतला.
प्रत्यक्षदर्शिंनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटानंतर तरुण खाली पडला आणि पुन्हा आपल्या जळत्या दुचाकीकडे गेला, ज्यामुळे त्याच्या अंगावरील आगीची तीव्रता अधिक वाढली. नमाजसाठी आलेल्या नागरिकांनी प्रसंगावधान राखून आपल्याकडील चटईच्या साहाय्याने तरुणाच्या अंगावरील आग विझवण्याचा प्रयत्न केला.
पोलीस प्रशासनाची धाव
घटनेची माहिती मिळताच नांदेड पोलीस परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनश कुमार, आणि इतवारा उपविभागाचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत शिंदे यांनी तातडीने घटनास्थळी आणि पोलीस स्टेशनला भेट दिली. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, दुचाकीच्या पेट्रोल टाकीचा स्फोट झाल्याने हा अपघात झाला असावा असा अंदाज आहे.
स्थिती चिंताजनक
जळालेल्या तरुणाला तातडीने रुग्णवाहिकेने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तो ९० टक्के भाजला असून त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. आरटीओ (RTO) ॲपवरील माहितीनुसार, ही गाडी शाम बाबाराव घाटगे यांच्या नावावर असल्याची माहिती समोर येत आहे, मात्र प्रशासनाकडून अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. या घटनेचा तपास सर्व अंगानी (Technical & Physical) केला जात आहे. सत्यता समोर येईपर्यंत नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. काही शंका असल्यास थेट पोलीस प्रशासनाशी संपर्क साधावा."
अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन
या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असून नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने जनतेला शांततेचे आवाहन केले आहे

COMMENTS