मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी उपसरपंच हणमंतराव हौसाजीराव गन्लेवार यांचे सुपुत्र सं...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथील ज्येष्ठ नागरिक तथा माजी उपसरपंच हणमंतराव हौसाजीराव गन्लेवार यांचे सुपुत्र संज्योत हणमंतराव गन्लेवार यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र राज्यसेवा आयोगाच्या ग्रुप 'ब' परीक्षेत यश संपादन करत पोलीस उपनिरीक्षकपदी यश मिळविले आहे. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे विविध स्तरांतून अभिनंदन कौतुक करण्यात येत आहे.
यावेळी उंद्री ( प.दे) गावचे पोलीस पाटील सविता विजयकुमार वादे यांनी पोलीस उपनिरीक्षक पदी निवड झाल्या बद्दल संज्योत गन्लेवार यांचा सत्कार केला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पगुच्छ, शाल-श्रीफळ देऊन गौरव केला.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द, कष्ट आणि योग्य मार्गदर्शनाच्या बळावर स्पर्धा परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण होऊ शकतात, अशा शब्दांत मान्यवरांनी कौतुक केले.

COMMENTS