नांदेड दि.20(प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दिला जाणारा सन 2020-21 या वर्षाचा मानाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जानापुरी ता. लोहा येथील राज्य पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षिका सौ.छायाताई तुकारामसिंह बैस-चंदेल यांना जाहीर झाला आहे.
पुरस्कार गौरव सोहळा दिनांक 25 आणि दिनांक 26 मार्च 2026 रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न होणार आहे.या प्रसंगी सदर पुरस्कार राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे , ना.सुनेत्रा अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे
याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री ना.रामदास आठवले विधानसभा अध्यक्ष ना. राहुल नार्वेकर,सामाजिक न्याय मंत्री ना. संजय शिरसाट,महिला व बालविकास मंत्री ना. माधुरी मिसाळ,खासदार अरविंद सावंत आणि मुंबईचे महापौर दत्तू तावडे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे
व्यसनमुक्ती चळवळीतील योगदानाची दखल शासनाने घेतली आहे.सौ. छायाबाई बैस चंदेल यांना शासकीय कर्मचारी या प्रवर्गातून व्यसनमुक्तीच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल हा पुरस्कार देण्यात आला आहे. रोख 15000/- सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह,शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
सौ. छायाताई बैस-चंदेल यांना आतापर्यंत 150 च्यावर विविध पुरस्काराने गौरविण्यात आले आहे . त्यांच्या या यशाबद्दल सर्व स्तरावरून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS