अर्धापूर (प्रतिनिधी - उद्धव सरोदे): श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे रौप्य महोत्सवी वर्षानि...
अर्धापूर (प्रतिनिधी - उद्धव सरोदे): श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय, अर्धापूर येथे रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 'माजी विद्यार्थी मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्यात विविध वर्षांतील १०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. अध्यक्षता: महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अजय टेंगसे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा पार पडला. विद्यार्थ्यांमधील स्नेहबंध दृढ करणे आणि महाविद्यालयाशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.मान्यवरांची उपस्थिती: व्यासपीठावर समन्वयक डॉ. रघुनाथ शेटे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲड. अमोल देशमुख, सचिव गजानन भवानकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करताना महाविद्यालयाने दिलेल्या संस्कारांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि संस्थेच्या विकासासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. रघुनाथ शेटे यांनी केले, सूत्रसंचालन डॉ. काजी मुख्तारोद्दिन यांनी तर आभार प्रदर्शन डॉ. साईनाथ शेट्टोड यांनी मानले. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व कर्मचाऱ्यांनी या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS