श्रीक्षेत्र माहूर माहूर तालुक्याला लागून गेलेल्या पैनगंगा नदी पात्रात धनोडा आणि केरोळीच्या मध्ये राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय ...
श्रीक्षेत्र माहूर माहूर तालुक्याला लागून गेलेल्या पैनगंगा नदी पात्रात धनोडा आणि केरोळीच्या मध्ये राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री नामदार संजय राठोड यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन कामास दि 19 रोजी 12.30 वाजता सुरुवात करण्यात आली यावेळी मान्यवरांची उपस्थिती होती भूमिपूजन प्रसंगी नामदार संजय राठोड माहूर किनवट चे आमदार भीमराव केराम महागाव उमरखेड चे आमदार किसनराव वानखेडे हदगाव हिमायतनगर चे आमदार बाबुराव पाटील कोहळीकर नांदेड जि प चे माजी उपाध्यक्ष समाधान जाधव जि प चे माजी सदस्य संजय राठोड भाजपा नेते नागेलीकर पाटील नगराध्यक्ष फिरोज दोसानी माजी नगराध्यक्ष प्रा राजेंद्र केशवे तहसीलदार अभिजीत जगताप उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांचे सह मान्यवरांची मंचावर उपस्थित होती यावेळी बोलताना नामदार संजय राठोड यांनी सांगितले की मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस नामदार राधाकृष्ण विखे पाटील हे पाणी व्यवस्थापनासाठी आग्रही असल्याने पैनगंगा नदी पत्रासह राज्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या कामांना लवकर सुरुवात करण्यात येणार असून हरितक्रांतीचे प्रणेते स्वर्गीय माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या स्वप्नातील हरित महाराष्ट्राच्या कामांना सुरुवात करण्यात येणार असून माहूर किनवट महागाव उमरखेड हदगाव मतदार संघातील एकही शेतकरी कोरडवाहू राहणार नाही याची दक्षता घेत कामांचे नियोजन करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगत दीक्षा गुरु श्री प्रेमसिंगजी बापू महाराज यांनी माहूर गडावर येणाऱ्या भाविक भक्तासाठी नदी पात्रात घाट आणि बंधारा बांधावा यासाठी अनेक दिवसापासून पाठपुरावा करून जमीन दान दिल्याने या कामाला प्राधान्य देत मंजुरी देण्यात आली असून एका वर्षात सदरील काम पूर्ण होणार असून भाविकांच्या आंघोळीची अद्यावत व्यवस्था करण्यात येणार आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी झालेल्या भूमिपूजन कार्यक्रमात पदाधिकारी अधिकारी भावीक भक्त नागरिक कंत्राटदार नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थित होती

COMMENTS