लोहा /प्रतिनिधी दि. २९ मार्च रोजी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी ...
लोहा /प्रतिनिधी दि. २९ मार्च रोजी शिवसेनेचे मुख्यनेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व शिवसेना पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शिवसेनेचे शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी लोहा येथे भरगच्च पत्रकार परिषदेत माहिती दिली..
यावेळी दता पवार, मारोती पंढरे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष दिलीप दादा धोंडगे, शिवराज पाटील धोंडगे, शिवसेना तालुकाप्रमुख नागोराव उमरेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष पाटील यंडाळे, नंदाजी इंगळे, जीवन पाटील वडजे, पिंटू माळवदे ,अमण पेटकर, आदी उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे म्हणाले की, गेल्या तीन ते चार दशकांच्या वाटचालीत जे शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आहेत त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेत प्रवेश केला.
याअगोदर आम्ही बीआर एस मध्ये प्रवेश केला त्यानंतर एम आर एस ची स्थापना केली होती. त्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील अनेक कार्यकर्त्यांनी त्यांच्या सोबत काम करण्याच्या हेतूने शिवसेनेत प्रवेश केला.
मला समजले या महाराष्ट्रात शेतकरी कष्टकरी यांच्याबाबत धडाकेबाज निर्णय घेणारे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे आहेत ते शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवू शकतात. उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून आम्ही निश्चिंत बळीराजाच्या पदरात आम्ही चांगल्या गोष्टी टाकू शकतोत . एक दिवस ते या राज्याचे निर्णय घेणारे सुप्रिमो होतील.
दि. २९ मार्च २०२६ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली बैल बाजार मैदानात सायंकाळी ६ वाजता राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन व शिवसेना पक्ष सोहळा होणार असुन या कार्यक्रमाला जवळपास ४० हजार शेतकरी येतील असे माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे म्हणाले.

COMMENTS