कै.सौ. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहाचे उद्घाटन
सेलू : एका कन्येचे जर चांगल्या प्रकारे शिक्षण झाले. तिच्यावर चांगले संस्कार झाले. तर दोन कुळांचा उद्धार होतो. मुली या रडणाऱ्या नाही. तर मॉ जिजाऊ, अहिल्यादेवी होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या सारख्या लढणाऱ्या घडल्या पाहिजेत. मुलींचे शिक्षण आणि संरक्षण ही काळाची गरज आहे. असे प्रतिपादन राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले.
शहरातील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशाला व श्रीमती तेजीबाई कन्हैयालाल अग्रवाल नूतन कन्या उच्च माध्यमिक विभाग, सेलू अंतर्गत कै. सौ. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहाचे उद्घाटन राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते रविवार (दि. १५) रोजी झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून सामाजिक कार्यकर्त्या रेखा राठी ( छत्रपती संभाजी नगर ) यांची उपस्थिती होती. व्यासपीठावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, शालेय समितीचे अध्यक्ष नंदकिशोरजी बाहेती, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, मुख्याध्यापक निशा पाटील,सुरजदेवी मालीवाल यांची उपस्थिती होती. पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की, "पैसा कमवण्याने जीवन सफल होते. पण तो योग्य रितीने खर्च केल्याने सार्थक होते. माणसाने रचनात्मक सामाजिक कार्य करावे. ज्ञानाची वाट उजळणाऱ्या कृती कराव्यात. काही पुण्य अशी करावित की, त्यामुळे आपले पुर्वज, आईवडिलांची किर्ती वाढेल. बाहेती परिवाराने आईच्या स्मरणार्थ उभारलेल्या सभागृहाने त्यांच्या आईच्या स्मृतीचा सुगंध चिरंतन दरवळत राहिलं. या सद्कृतीने गाव, समाजाचे, देशाचे, पिढ्यानपिढ्यांचे भविष्य उज्वल होईल." असेही ते म्हणाले. कार्यक्रमात रेखा राठी यांनीही मनोगत व्यक्त केले.
*नूतन कन्या प्रशालेस सभागृह उभारणीत मोलाचे आर्थिक योगदान दिल्याबद्दल शिवणारायणजी बाहेती,विणा बाहेती, नंदकिशोरजी बाहेती, कांचन बाहेती, रामवल्भजी बाहेती, रमा बाहेती यांचा स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.*
संगीत शिक्षक सच्चिदानंद डाखोरे, पुजा महाजन यांनी ' आज सोनीयाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू ' हा अभंग सादर केला. त्यांना अतुल पाटील, गिरीश दिक्षित यांनी साथसंगत दिली. शालेय परिसरात विद्यार्थीनींनी राधा,कृष्ण,राम, लक्ष्मण,
सीता, विठ्ठल,रूक्मिणी,संत ज्ञानेश्वर, संत मुक्ताबाई यांची देखावे सादर केली. ज्येष्ठ शिक्षक नागेश देशमुख यांनी संत तुकाराम महाराज यांची वेशभूषा साकारली. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी. के.देशपांडे, कार्यकारिणी सदस्य, प्राचार्य डॉ. उत्तम राठोड, विविध क्षेत्रातील मान्यवर यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, पर्यवेक्षक डी.बी. घोगरे, डॉ.बाबासाहेब थोरे,शशिकांत देशपांडे, सुहास देऊळगावकर, सतीश कुंडीकर, सुरेखा आगळे आणि शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला
सेलू येथील नूतन कन्या प्रशालेच्या सभागृहाच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना स्वामी गोविंददेव गिरिजी महाराज. व्यासपीठावर डॉ. एस.एम. लोया, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी,रेखा राठी, निशा पाटील, सुरजदेवी मालीवाल.
* कै.सौ. कमलाबाई आसारामजी बाहेती सभागृहाच्या कोनशिलेचे अनावरण प्रसंगी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, डॉ.एस.एम. लोया,प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती

COMMENTS