नुकतेच नांदेड महानगरपालिकेची निवडणूक होऊन एक हत्ती सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टी पहिल्या सभेत नांदेडकरांना पाच वर्षातील नांदेडचा विकासा...
नुकतेच नांदेड महानगरपालिकेची निवडणूक होऊन एक हत्ती सत्ता असलेल्या भारतीय जनता पार्टी पहिल्या सभेत नांदेडकरांना पाच वर्षातील नांदेडचा विकासाचा व्हिजन आराखडा दाखवून. उद्योग. शिक्षण. रस्ते. ट्राफिक. शुद्ध पाणी. गटाराचे सुनियोजित विल्हेवाट याविषयी मास्टर प्लॅन आखणीची अपेक्षा होती. परंतु पहिले पाढे 55 या म्हणी प्रमाणे नांदेडच्या नगरसेवकांनी पुतळ्यांचा विषय काढून नांदेडकरांची थट्टा केली. गेल्या महानगरपालिकेच्या टर्म वेळेस सन्माननीय माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण साहेब यांच्यावर विश्वास ठेवून जवळपास 70 च्या वर नगरसेवक नांदेडच्या जनतेने निवडून दिले होते त्या पंचवार्षिक योजनेत नांदेडच्या मूलभूत सुविधा कडे सर्व नगरसेवकांनी पाठ फिरवली. चव्हाण साहेबांचे पक्षांतर नंतर अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली नांदेड महानगरपालिकेत भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर पहिल्या सभेत विकासाची चर्चा. विकासाचा मास्टर प्लॅन. व्हिजन आराखडा. मेट्रो सिटी नांदेड आराखडा अशा प्रकारचे विकासाच्या कामावर चर्चा सत्ताधारी भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांनी न करता पुतळ्याचे राजकारण करून नांदेड शहरामध्ये जाती जाती मध्ये तेढ निर्माण करण्याचं सत्ताधारी भारतीय जनता पार्टी करत आहे असे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मारावार यांनी म्हटले आहे.ज्या विश्वासाने नांदेडच्या जनतेने भारतीय जनता पार्टीला बहुमत दिल्यानंतर नगरसेवकांची वागणूक बघता पुन्हा महानगरपालिकेत पहिले पाढे 55 म्हणण्याची पाळी नांदेडकरांना आली. असे रोखठोक मत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रकाश मारावर यांनी व्यक्त केले.

COMMENTS