ज्ञान हेच सर्वात मोठे धन याची जाणीव सदैव असावी - गोविंददेव गिरीजी महाराज

बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू नामविस्तार सोहळा उत्साहात संपन्न  सेलू : हे युग ज्ञानाचे आहे. ज्ञान हेच सर्वात मोठे धन आहे. याची जाणी...


बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू नामविस्तार सोहळा उत्साहात संपन्न 

सेलू : हे युग ज्ञानाचे आहे. ज्ञान हेच सर्वात मोठे धन आहे. याची जाणीव सर्वांना सदैव असावी. जे काही महान घडते ते ज्ञानाच्या बळावर घडते. ज्या देशाचे तंत्रज्ञान विकसित तो देश जिंकतो. आपल्या समोर ध्येयवाद असावा. विद्यार्थी घडविण्यात सर्वात मोठे शिक्षकांचे योगदान असते. म्हणूनच आपल्या मुलांप्रमाणे सर्वस्व झोकून देऊन शिक्षकांनी काम केले तरच विद्यार्थी घडतात. असे प्रतिपादन राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले. शहरातील नूतन इंग्लिश स्कूल, सेलू या विद्यालयाचा बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू असा नामविस्तार सोहळा उत्साहात संपन्न झाला. सी.बी.एस.सी. दर्जा प्राप्त बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू नामविस्तार कोनशिलेचे अनावरण रविवार ( दि. १५) रोजी श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास, अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी श्रीगोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम. लोया हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून बुलढाणा अर्बन को. ऑप क्रेडीट सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष राधेश्यामजी चांडक हे होते. नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे व्यासपीठावर संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सहसचिव जयप्रकाशजी बिहाणी, कार्यकारिणी सदस्य नंदकिशोरजी बाहेती, शालेय समितीचे अध्यक्ष प्रकाशचंदजी बिनायके, सावित्रीबाई बिहाणी यांची उपस्थिती होती.  पुढे बोलताना स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज म्हणाले की, " नूतन इंग्लिश स्कूलचा हा केवळ नामविस्तार नाही तर अंतरंग कार्य विस्तार आहे. मिळवलेली संपत्ती कुठे खर्च करावी हे ज्याला कळतं त्यांच जीवन सार्थकी लागते. या दृष्टीने बाहेती बिहाणी परिवाराचे हे रचनात्मक कार्य आहे. आपण देशाचे भविष्य घडवीत आहोत या जाणिवेने शिक्षकांनी विद्यार्थ्यांना उत्तमोत्तम घडवणे हा त्यांचा खरा धर्म आहे. विद्यार्थ्यांत ज्ञानाची भूक, तहान  निर्माण करणे हे शिक्षकांचे काम आहे. विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत." असेही ते म्हणाले. या प्रसंगी राध्येश्यामजी चांडक यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष डी.के. देशपांडे, प्रशासकीय अधिकारी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, कार्यकारिणी सदस्य दत्तराव पावडे, राजेशजी गुप्ता, कार्यकारिणी सदस्य पालक, विविध क्षेत्रातील असंख्य मान्यवर यांची उपस्थिती होती. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर यांनी केले. सुत्रसंचलन सपना सानप यांनी केले. तर भूषण देऊळगावकर आभार प्रदर्शन यांनी केले.

स्वामीजींच्या हस्ते मान्यवरांचे सत्कार* 

जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ. एस.एम.लोया, फुलकंवर लोया यांचा तसेच बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या जडणघडणीत मोलाचे आर्थिक योगदान दिल्याबद्दल सावित्रीबाई बिहाणी, जयप्रकाशजी बिहाणी, विजय बिहाणी, किरण बिहाणी, कमला बिहाणी, नंदकिशोरजी बाहेती, शिवणारायणजी बाहेती, रामवल्भजी बाहेती,विणा बाहेती,कांचन बाहेती, रमा बाहेती यांचा स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

*चिमुकल्यांच्या ' गीतासार ' नृत्यनाट्य सादरीकरणाने भारावले श्रोते* 

बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी शालेय परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून, राज्याभिषेकापर्यंत सजीव देखावा सादर केला. सिनियर के.जी.च्या विद्यार्थ्यांनी ' सुबह सबेरे लेकर तुम्हारा नाम, प्रभू करते है हम अपना काम सुरू ' ही प्रार्थना सादर केली. तर चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या 'गीतासार ' नृत्यनाट्य सादरीकरणाने श्रोते भारावून गेले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य नरेंद्र पाटील, देखावा संयोजक प्रणिता सोलापूरे, नृत्य नाटिका संयोजक सिमा सोनपावले, ज्योती जोशी आणि शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.बाहेती बिहाणी नूतन इंग्लिश स्कूल, सेलू नामविस्तार कोनशिलेचे अनावरण प्रसंगी स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज, राध्येश्यामजी चांडक, प्राचार्य डॉ. विनायकराव कोठेकर, सावित्रीबाई बिहाणी, जयप्रकाशजी बिहाणी, नंदकिशोर बाहेती, प्रकाशचंदजी बिनायके.

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Channel