स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत स्कूल ऑफ फार्मसी येथे बी.फार्मसी व एम. फार्मसी विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस प्लेसमेंट ड्राइव्ह आयोजित करण्यात आला होता. हा उपक्रम ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग आणि स्कूल ऑफ फार्मसी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट टीमच्या सहकार्याने पार पडला.
या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये जेनो फार्मासिटिकल लि. पुणे या नामांकित औषधनिर्मिती कंपन्यांनी सहभाग घेतला होता, विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष मुलाखती घेऊन १८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली.
हा प्लेसमेंट ड्राईव्ह कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. ड्राईव्ह यशस्वी करण्याकरिता विद्यापीठाचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंट ऑफिसर डॉ. बालाजी मुधोळकर, स्कूल ऑफ फार्मसीचे संचालक डॉ. संजय पेकमवार, समन्वयक डॉ. शशिकांत ढवळे तसेच प्रशिक्षण व प्लेसमेंट समिती सदस्य वैशाली शेळके, वर्षा कदम आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
सदर प्लेसमेंट उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना अग्रगण्य औषधनिर्मिती व जैवतंत्रज्ञान क्षेत्रात करिअरच्या उत्कृष्ट संधी उपलब्ध झाल्या असून विद्यापीठाच्या उद्योगाभिमुख शैक्षणिक धोरणाला अधिक बळकटी मिळाली आहे.

COMMENTS