ग्राम विकास शिक्षण संस्था, चिखली ता. कंधार संचलित.. रत्नेश्वरी माध्यमिक विद्यालय, वडेपुरी येथे जागतिक महिला दिन 2026 आज उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ. मीराबाई लक्ष्मणराव बोडके या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून: सहाय्यक वैद्यकीय अधिकारी_ डॉ. सौ दर्शना पवार मॅडम, करिष्मा नाखले मॅडम_सहाय्यक शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, वडेपुरी तसेच आशा वर्कर_ मंजुषाताई पवार, वंदना दळवे, अंगणवाडी सेविका_ सौ. गंगाबाई लहुजी सारंगे, सुनिता काळेवाड, महादेवी पांचाळ, सहशिक्षिका_गिरी मॅडम, शाळेच्या माता पालक संघाच्य अयक्ष_ गोदावरी राऊत आणि उपाध्यक्ष_सोनी भुरेवार यांच्यासह गावातील सामाजिक जीवनात कार्यरत असणाऱ्या महिलांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी प्रास्ताविक पर भाषण मुख्याध्यापक_ रत्नाकर फुलारी यांनी केले तर डॉ. दर्शना पवार मॅडम यांनी महिला दिनाच्या निमित्ताने सविस्तर मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनी आणि सामाजिक बांधिलकी मध्ये महिलांचे वाढते योगदान तसेच युवावर्ग आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या उपयोगाने येणाऱ्या काळात महिलांनी विविध आव्हाने पेरण्यासाठी कशाप्रकारे सक्षम राहावे आणि आत्मसुरक्षा याबरोबरच आरोग्य आणि शिक्षण याबाबतीत अभ्यासपूर्वक भविष्य जाणून कशाप्रकारे यशस्वी व्हावे याचा कानमंत्र देऊन सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी शाळेतील शिक्षक_विठ्ठल मुत्तेपवार,नामदेव बोडके,सुरेश कंधारकर, बालाजी मोरे , लिपिक_ उमेश कदम आणि शाळेतील कर्मचारी_माधव राऊत आणि शेख नबी यांच्यासह सर्व विद्यार्थी. विद्यार्थिनी माता पालक आणि प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती.

COMMENTS