शिक्षण, सौर ऊर्जा आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी 'जॉब सेंटर'वर विशेष भर नांदेड, दि. २० मार्च २०२६: सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बो...
शिक्षण, सौर ऊर्जा आणि सुशिक्षित बेरोजगारांसाठी 'जॉब सेंटर'वर विशेष भर
स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना: शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या नावाने भव्य विद्यापीठ (University) स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.
शाळेचा कायापालट: बाफना रोड येथील 'खालसा हायस्कूल'ची जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी सर्व आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशी नवीन इमारत उभारली जाणार आहे.
बेरोजगारांना मदतीचा हात: सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्री हजूर साहिब सार्वजनिक वाचनालयात 'श्री गुरु अर्जन देव जी जॉब इन्फॉर्मेशन सेंटर' सुरू करण्यात आले आहे.
महिला शिक्षण व शिष्यवृत्ती: होतकरू विद्यार्थ्यांसाठी विविध स्कॉलरशीप आणि विशेषतः महिलांसाठी 'फ्री-एज्युकेशन स्कीम' (मोफत शिक्षण योजना) राबवण्यावर प्रशासकांनी भर दिला आहे.
पर्यावरणपूरक पाऊल: वीज बचतीसाठी आणि प्रदूषण रोखण्यासाठी गुरुद्वारा परिसरात मोठ्या प्रमाणावर सौर ऊर्जा (Solar Plant) प्रकल्प उभारले जाणार आहेत.
प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांचे प्रतिपादन:
"हे बजेट केवळ आकड्यांचा खेळ नसून समाजाच्या सर्वांगीण विकासाचा आराखडा आहे. शिक्षण आणि रोजगार या दोन गोष्टींवर आम्ही सर्वाधिक लक्ष केंद्रित केले आहे, जेणेकरून आमची तरुण पिढी सक्षम होईल," असे मत प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ यांनी व्यक्त केले.
या महत्त्वपूर्ण बैठकीला सल्लागार स. जसवंत सिंघ (बॉबी), प्र. अधीक्षक स. रविंदर सिंघ कपूर, सहा. अधीक्षक स. जयमल सिंघ ढिल्लो, स. बलविंदर सिंघ फौजी, स्विय सहाय्यक श्रीमती बबीता कौर चाहेल, लेखापाल स. सतविंदर सिंघ रामगडीया आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
नांदेड, दि. २० मार्च २०२६: सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारा बोर्डाचे आर्थिक वर्ष २०२६-२७ चे १७० कोटी रुपयांचे भव्य आणि सर्वसमावेशक बजेट आज गुरुद्वारा बोर्डाचे प्रशासक डॉ. स. विजय सतबीर सिंघ यांच्या अध्यक्षतेखाली मंजूर करण्यात आले. श्री गुरु अंगद देव जी यात्री निवास येथील कार्यालयात झालेल्या या बैठकीत बोर्डाने शैक्षणिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.
बजेटमधील महत्त्वाची आकर्षणे:स्वतंत्र विद्यापीठाची स्थापना: शिखांचे नववे गुरु श्री गुरु तेग बहादूर साहिब जी यांच्या नावाने भव्य विद्यापीठ (University) स्थापन करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे.

COMMENTS