नांदेड: नांदेड येथील ५०० खाटांच्या श्रेणीवर्धीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देऊन आ...
नांदेड: नांदेड येथील ५०० खाटांच्या श्रेणीवर्धीत जिल्हा सामान्य रुग्णालयाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. या रुग्णालयाला प्रशासकीय मान्यता देऊन आशियाई विकास बँकेच्या (ADB) आर्थिक साह्यातून निधी उपलब्ध करून देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत केली.भोकर विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा आमदार श्रीजया चव्हाण यांनी विधानसभेत यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. नांदेड जिल्ह्याची ३६ लाखांहून अधिक लोकसंख्या आणि शेजारील जिल्हे तसेच तेलंगणातून येणाऱ्या रुग्णांचा ओघ पाहता सध्याची रुग्णालय क्षमता अपुरी असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकानुसार जिल्ह्यात ३,७०० खाटांची गरज असताना केवळ १,९३० खाटा उपलब्ध असल्याची आकडेवारी त्यांनी मांडली.यावर सकारात्मक प्रतिसाद देत आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, राज्य सरकार आशियाई विकास बँकेकडे ४,५०० कोटी रुपयांच्या वित्तीय साह्याचा प्रस्ताव सादर करणार असून, त्यातून नांदेडच्या रुग्णालयाला आवश्यक निधी दिला जाईल. माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी या रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनासाठी पाठपुरावा केला होता, आता त्याला प्रशासकीय मान्यतेचे बळ मिळणार आहे.

COMMENTS