किनवट प्रतिनिधी | दि. १४ : किनवट शहरातील शिवाजीनगर परिसरातील रेल्वे अंडरब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रा...
किनवट प्रतिनिधी | दि. १४ : किनवट शहरातील शिवाजीनगर परिसरातील रेल्वे अंडरब्रिजचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची गंभीर दखल घेत किनवट नगर परिषदेच्या नगराध्यक्षा सौ. सुजाता विनोद येंड्रलवार यांनी रेल्वे प्रशासनाकडे सविस्तर निवेदन सादर केले आहे. अंडरब्रिजची तातडीने दुरुस्ती करावी तसेच निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शहरातील शिवाजीनगर भागात रेल्वे मार्गाखाली बांधण्यात आलेला हा अंडरब्रिज स्थानिक नागरिक, विद्यार्थी तसेच दुचाकी व चारचाकी वाहनधारकांसाठी महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र अंडरब्रिजवरील सिमेंट रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीने झाल्यामुळे वाहनांची ये-जा होताना मोठ्या प्रमाणात सिमेंटचा धूर उडत आहे. परिणामी या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना धुराच्या लोटांचा सामना करावा लागत असून डोळ्यांची जळजळ, श्वसनाचा त्रास तसेच इतर आरोग्यविषयक समस्या निर्माण होत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून होत आहेत.
या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. सुजाता येंड्रलवार यांनी दक्षिण मध्य रेल्वेचे सिकंदराबाद येथील जनरल मॅनेजर तसेच नांदेड विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांना लेखी निवेदन पाठवून या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
निवेदनात अंडरब्रिजची तातडीने तांत्रिक पाहणी करून सिमेंटच्या धुरावर नियंत्रण मिळवण्यासाठी आवश्यक ते आवरण घालावे किंवा त्या ठिकाणी डांबराचा योग्य थर टाकावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित कंत्राटदाराने केलेल्या निकृष्ट कामाची चौकशी करून त्याच्याविरुद्ध कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.
दरम्यान, या समस्येमुळे नागरिकांच्या आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून रेल्वे प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडूनही होत आहे.

COMMENTS