(महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन) नांदेड:( दि.१६ मार्च २०२६) यशवंत महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय सहायता...
(महिला दिनानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन)
नांदेड:( दि.१६ मार्च २०२६)
यशवंत महाविद्यालयात जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून वैद्यकीय सहायता कक्ष आणि महिला सुरक्षा व सुधार समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे होते. उपप्राचार्या डॉ. कविता सोनकांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते डॉ. पियुष सक्सेना होते. वैद्यकीय साहाय्यता कक्षाचे समन्वयक डॉ. एस. एम. मोरे व डॉ. मंगल कदम, महिला सुरक्षा व सुधार समिती समन्वयक तसेच सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांची उपस्थिती होती.
आजच्या धावपळीच्या आणि ताणतणावाच्या जीवनशैलीमुळे अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. अशा परिस्थितीत शरीर निरोगी ठेवण्यासाठी नैसर्गिक, सोप्या आणि प्रभावी पद्धतींचा अवलंब करणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. याच अनुषंगाने प्रमुख वक्ते डॉ. पियुष सक्सेना यांनी, टीम क्लिंजिंग थेरपी (सफाई उपचार) अवलंबा आणि औषधमुक्त व रोगमुक्त जीवन जगा
या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर मार्गदर्शन केले. प्रारंभी प्रास्ताविक डॉ. एस. एम. मोरे यांनी केले.
क्लिंजिंग थेरपीच्या माध्यमातून शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर काढून आरोग्य कसे सुधारता येते, तसेच विविध आजारांपासून नैसर्गिक पद्धतीने कसे मुक्त होता येते, याविषयी त्यांनी सविस्तर माहिती दिली.
डॉ. पियुष सक्सेना यांनी अत्यंत सोप्या, स्पष्ट आणि प्रभावी पद्धतीने क्लिंजिंग थेरपीचे महत्त्व उलगडून सांगितले.
अध्यक्षीय समारोप प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी केला. शेवटी आभार डॉ. निताराणी जैस्वाल मॅडम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील आदींनी सहकार्य केले.

COMMENTS