कर्मयोगी बाबासाहेब देशमुख ऊर्फ केशव नारायणराव देशमुख हेआधुनिक भारतीय शिक्षणपरंपरेतील एक दुर्लक्षित, पण अत्यंत दूरदृष्टीचेसमाजशिल्पकार होते. ...
कर्मयोगी बाबासाहेब देशमुख ऊर्फ केशव नारायणराव देशमुख हेआधुनिक भारतीय शिक्षणपरंपरेतील एक दुर्लक्षित, पण अत्यंत दूरदृष्टीचेसमाजशिल्पकार होते. सन १९५९ मध्ये त्यांनी सगरोळी ता. बिलोली जि.नांदेड येथे उभारलेली ‘संस्कृती संवर्धन मंडळ’ ही संस्था केवळ शिक्षणदेणारी नव्हे, तर समग्र माणूस घडविणारी जिवंत प्रयोगशाळा आहे. शिक्षणम्हणजे फक्त ज्ञानार्जन नव्हे तर, सामाजिक मानवीमूल्य, जाणीव, आत्मनिर्भरता आणि देशाचे जबाबदार समंजस, सुसंस्कृत नागरिकबनविणारी प्रणाली आहे, हा विचार बाबासाहेबांनी प्रत्यक्ष कृतीतून साकारकरून दाखवला.
मी १९८७ ते १९९१ या कालखंडात त्यांच्या संस्थेतील शिवाजीहायस्कूल, शारदानगर, सगरोळी येथे १० वी पर्यंतचे शिक्षण घेतले. त्याकाळातील शैक्षणिक, सामाजिक, नैतिक व वैचारिक संस्कारांनी माझ्याजीवनात आमूलाग्र बदल घडला. या सर्व प्रक्रियेच्या केंद्रस्थानीबाबासाहेबांची दूरदृष्टी, संस्थात्मक नियोजन आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वहोते. अतिदुर्गम ग्रामीण भागात, मूलभूत सुविधांचा अभाव असतानाहीबाबासाहेबांनी उभारलेली संस्था म्हणजे ही समकालीन विकास मॉडेलचेउत्तम उदाहरण ठरली. शिक्षणासोबत अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य, शेती, कौशल्यविकास, सांस्कृतिक उपक्रम, विज्ञान, पर्यावरण आणि सम्यकराष्ट्रभावना यांचा एकात्मिक विचार त्यांनी विध्यार्थ्यांसाठी राबवला. शाळा, वस्तीगृहे, शेती, आरोग्यसेवा व तांत्रिक शिक्षण यांचा समन्वय म्हणजेबाबासाहेबांची यातून विकासाची दृष्टी दिसून येते. वस्तीगृह प्रणाली हीत्यांनी विध्यार्थ्यांच्या जीवनात सामाजिक समता व न्याय संकल्पनेची मूर्तभावना रुजवली. सरदार, चैतन्य, सेवाग्राम, बालक मंदिर आणि बालग्राम हीकेवळ निवासस्थाने नव्हती, तर संधीसमानता, आत्मसन्मान आणि सामाजिकएकता घडवणारी केंद्रे होती. अनाथ, गरीब व वंचित घटकांतील विद्यार्थ्यांनाशिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे ही बाबासाहेबांची ती सामाजिकबांधिलकी होती.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक संवेदनशीलता निर्माण करण्यासाठीसण-उत्सवांनाही सामाजिक मूल्यांची जोड दिली. दिवाळीसारख्या सणाच्यानिमित्ताने ‘आव्हान पत्राच्या’ माध्यमातून अनाथ मुलांसाठी निधी संकलनाचीसंकल्पना ही आजच्या सामाजिक उत्तरदायित्व शिक्षणाची पूर्वपीठिका होती. आर्थिक साक्षरतेसाठी संचयिका बँक, श्रमदान, उत्पादनाधारित उपक्रमआणि श्रमसंस्कृतीची जोपासना हे बाबासाहेबांच्या शिक्षणदृष्टीचे वैशिष्ट्यहोते. यातून मला आचार्य विनोबा भावे यांच्या जीवन आणि शिक्षण यासंकल्पनेची ओळख पटते. ‘कुमार वस्तू भांडार’, कॅन्टीन, आरोग्यसेवा, निवास व अनाथासाठी अन्नव्यवस्था या सगळ्यांचा समन्वय म्हणजेविद्यार्थ्यांचे स्वावलंबनाचे प्रत्यक्ष रूप होते, असे म्हटले तर चुकीचे ठरू नये. आठवीपासूनच विद्यार्थ्यांना वेल्डिंग, वायरमन, फिटर, कारपेंटर, तसेच बुकबाइंडिंग, केक-बिस्किट निर्मिती, संगीत, गायन व चित्रकला यांसारख्याकौशल्यांचे शिक्षण दिले जात होते. आज नवीन शेक्षणिक धोरण २०२० ज्याकौशल्याधारित शिक्षणाची भाषा आपण करतो, ती संकल्पना बाबासाहेबांनीपाच दशकांपूर्वीच प्रत्यक्षात आणली होती. यातून त्यांची दूरदृष्टी कळते.प्रार्थना, योग, सूर्यनमस्कार, व्यायाम आदी दिनचर्येच्या माध्यमातून नैतिकशिस्त व आत्मसंयमाची निर्मिती झाली. जिम्नॅस्टिक, घोडसवारी, स्विमिंग, मॅरेथॉन, व्हॉलीबॉल, मलखांब यांसारख्या क्रीडा प्रकारांत येथील विद्यार्थीराज्य व राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचले. एनसीसी, स्काऊट-गाईड, विज्ञानप्रदर्शन व पर्यावरणीय उपक्रमांमधून विध्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभावना आणिवैज्ञानिक दृष्टिकोन घडवण्यात आला. १९९० पासून पाणलोट क्षेत्रात मोठ्याप्रमाणावर कार्यास सुरुवात झाली. त्यानंतर १९९५–९६ मध्ये सैनिकी शाळेचीस्थापना झाली. पुढे २०१२ पासून कृषी विज्ञान केंद्र कार्यरत झाले. २०१६मध्ये नीती आयोग मान्य कोडिंग लॅबची स्थापना झाली आणि अखेरीस२०२५–२६ मध्ये केंद्रीय सैनिकी शाळेची मान्यता मिळाली. ही सर्व मजलदरमजल झालेली प्रगती संस्थेच्या राष्ट्रनिर्मितीतील योगदानाची ठोस साक्षठरते.
बाबासाहेबांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त मला असे वाटते कि,कर्मयोगी बाबासाहेब देशमुख हे केवळ संस्थाचालक नव्हते तर ते एकविचारप्रवाह होते. त्यांनी केवळ शिक्षणसंस्था उभारली नाही, तर समाजजडणघडणीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांनी केवळ इमारती उभारल्या नाहीत, तरत्यांनी इमारतीच्या भिंती बोलत्या केल्या. अनेक समाजभिमुख पिढ्याघडवल्या. एकूण काय तर, बाबासाहेबानी जी संस्था ज्या परिसरात उभीकेली हेच मुळात एका ध्येय वेड्या व्यक्तिमत्वाची ओळख आहे.वर्तमानकाळाच्या चार ते पाच दशक पुढे हे असणारे बाबासाहेब देशमुखकेवळ एका परिसरापुरते मर्यादित नव्हते. त्यामुळे बाबासाहेब देशमुख हेआधुनिक शिक्षणदृष्टीचे खरे शिल्पकार आहेत. अशा या महान कर्मयोग्यासजन्मशताब्दी वर्षानिमित्त माझे विनम्र अभिवादन.

- प्रा. डॉ. भूपेश गोपालराव नेम्मानीवार
- सहाय्यक प्राध्यापक व विभाग प्रमुख, भौतिकशास्त्र विभाग
- दिगंबरराव बिंदू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, भोकर
- जिल्हा नांदेड, महाराष्ट्र
- ९४२३३०६८६४, bhupesh.nemmaniwar@rediffmail.com

COMMENTS