नांदेड : नांदेड दक्षिण भागातील त्रिकूट येथील गणपती मंदिर परिसराचे सुशोभीकरण गावअंतर्गत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करणे,गाडेगाव येथील जोड रस्ता दुरुस्तीकरण ,सिद्धनाथ येथील सिद्धनाथ मंदिर परिसर श्री शिवानंद स्वामी महाराज मठ परिसराचे सुशोभीकरण या कामाची भूमिपूजन आणि तुप्पा येथील रस्ते विकासाच्या कामांचे आ.आनंदराव पाटील बोंढारकर यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले . ना.हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आ .बोंढारकर यांच्या माध्यमातून नांदेड दक्षिण मध्ये विकास कामांचा सपाटा मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
आयोजित करण्यात आलेल्या भूमिपूजन सोहळ्याला शिवसेना जिल्हाप्रमुख विनय पाटील गिरडे, तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे, युवासेना जिल्हाप्रमुख बाळु पाटील मोरे, शहरप्रमुख तुलजेश यादव, तालुकाप्रमुख अशोक मोरे, शहरप्रमुख सुहास खराणे पाटील,बाबुराव पाटील गाडेगावकर,मा.जि.प सदस्य शिवाजीराव कदम,युवासेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील सपुरे,बालाजी भायेगावकर, बामनाजी पाटील,बळी उबाळे,गजु उबाळे, संभाजी पाटील, सरपंच बाबु पाटील, सरपंच नागोराव पाटील वडजे,पोलीस पाटील माधव पाटील वडजे, तंटामुक्ती अध्यक्ष बंडू पाटील वडजे,श्रीराम पाटील वडजे,सुलुसिंग सपुरे,कालूसिंग सपुरे,गंगाराम पाटील वडजे,योगेश पाटील वडजे, बालाजी पाटील वडजे,सुदिन पाटील बांगल,रवि थोरात,श्याम पाटील वानखेडे, अमोल गोडबोले यांच्यासह आधी पदाधिकारी व सर्व गावातील प्रतिष्ठित नागरिक गावकरी उपस्थित होते.
दरम्यान त्रिकुट येथील गणपती मंदिर परिसराच्या सुशोभीकरणासाठी 46 लाख 52 हजार रुपयांचा निधी तसेच
पुनर्वसन योजने अंतर्गत त्रिकूट अंतर्गत सी.सी.रस्ता व नाली बांधकाम करण्यासाठी रु.109 लाख 96 हजार रुपयांचा निधी आ. बोंढारकर यांनी मंजूर केला आहे. गाडेगाव येथील जोड रस्त्याच्या विकासासाठी दोन कोटी 79 लाख 11 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. सिद्धनाथ येथील शिवानंद स्वामी महाराज मठ परिसराच्या सुशोभीकरणासाठी 49 लाख 54 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून तुप्पा ते चंदासिंग कॉर्नर रस्ते विकासासाठी एक कोटी 97 लाख 23 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या सर्व विकास कामांचे भूमिपूजन आज आ. बोंढारकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित जनतेशी संवाद साधताना आ. बोंढारकर म्हणाले की , नांदेड दक्षिण मध्ये विकासाची कामे सुरूच राहतील. जनतेला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ना. हेमंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे , मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस , उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे पाठपुरावा सुरूच राहिला असा विश्वास दिला.

COMMENTS