नांदेड - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूकीच्या तयारीला लागण्याच्या सुचना काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष (उतर) श्री राजेश पावडे यांनी आज काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षाच्या बैठकीत दिल्या आहेत. ही बैठक जिल्हा काँग्रेस कार्यालयात पारपडली त्यावेळी श्री पावडे बोलत होते. पुढे बोलताना पावडे म्हणाले की पंतप्रधान मोदी यांनी अमेरीकेच्या आहारी जाऊन भारतीय शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या निर्यातीवर 18 टक्के आधिभार देण्याचा तसेच अमेरिकेचा शेतीमाल भारतात विना आधिभार विकण्याचा करार करून केसाने गळा कापला आहे. असा आरोप पावडे यांनी केला आहे. मोदी यांचे नाव एपस्टीन फाईल्स मध्ये अनेक वेळा आले असून भारतीयांना शरमेने मान खाली घालावी लागत आहे. तेंव्हा मोदींनी स्वेच्छेने पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा या मागणीसाठी 16 फेब्रुवारी या तारखेला नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहेत.अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबीसी समितीचे अध्यक्ष प्रा. यशपाल भिंगे यांनी या बैठकीत दिली.या बैठकीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती सरचिटणीस डा. रेखाताई चव्हाण, केदार पाटील सोळंके, जिल्हा सरचिटणीस आनंद कल्याणकर, कुमार कुर्तडीकर, प्रा. संदिप देशमुख बारडकर, संदिप देशमुख तरोडेकर, दीपकसिंग हजुरिया, डॉ. भगवानराव मनुरकर, प्रतापराव देशमुख बारडकर, सुनील वानखेडे, आनंदराव टोपदळे, कदम,
नागेश सुजले गावकर बालासाहेब देशमुख आंबेगावकर, भगवानराव मारोतराव पवार निवघेकर नंदकिशोर देशमुख उचेगावकर, दिगंबर रामचंद्र पवार, अनिल पाटील चिमेगावकर, सुभाष लोणीकर, किसनराव नानाराव सूर्यवंशी, नितेश बालाजी लोणे, देविदास कदम, कुंभार किरण पडलवार, बालाजी हर्जी जाधव, साईनाथ देवराव खोरगाव समद सय्यद, संग्राम जगदीश देशमुख, शेख मकसूद, अरविंद क्षीरसागर, गोष कुरेशी, रवींद्र डहाळे, राजेश सूर्य, किशनराव सूर्यवंशी, सोपान प्रकाशराव बोले आदी उपस्थित होते

COMMENTS