किनवट, दि. २६ (प्रतिनिधी) : आगामी धुलीवंदन, होळी, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा आदी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व ...
किनवट, दि. २६ (प्रतिनिधी) : आगामी धुलीवंदन, होळी, रमजान ईद, रामनवमी, हनुमान जयंती, गुढीपाडवा आदी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी किनवट पोलीस स्टेशन येथे शांतता समितीची बैठक घेण्यात आली. सणांच्या काळात धार्मिक सौहार्द बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा पोलीस निरीक्षक गणेश कराड यांनी यावेळी दिला.
बैठकीत बोलताना कराड म्हणाले, सण हे एकात्मतेचे प्रतीक आहेत. शहरातील सर्व समाजघटकांनी परस्पर समन्वय राखून सणोत्सव शांततेत साजरे करावेत. कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेण्याचा प्रयत्न झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
सोशल मीडियावर पोलिसांची ‘वॉच’
सणोत्सव काळात सोशल मीडियावर अफवा पसरविण्याचे प्रकार वाढतात. सायबर सेलचे अशा संदेशांवर बारकाईने लक्ष असून, आक्षेपार्ह पोस्ट टाकणे किंवा अफवा फॉरवर्ड करणे दंडनीय ठरेल, असे त्यांनी स्पष्ट केले. नागरिकांनी अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवता प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
नियमांचे पालन आवश्यक
मिरवणुका, धार्मिक कार्यक्रम व सार्वजनिक उत्सवांसाठी परवानगी घेणे, ठरवून दिलेल्या वेळांचे पालन करणे तसेच ध्वनीप्रदूषणासंदर्भातील नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही सूचित करण्यात आले. कोणतीही संशयास्पद हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना कळवावे, असे आवाहन करण्यात आले.
बैठकीस शहर व तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, विविध धर्मगुरू, सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी सणोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज असून, शहरात शांतता व सलोखा कायम राखण्यासाठी आवश्यक ती सर्व उपाययोजना करण्यात येत असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

COMMENTS