उमरी प्रतिनिधी
महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, वेदमुर्ती परमपूज्य प्रणव शास्त्री धानोरकर यांचे महाशिवरात्रीच्या पर्व काळावर नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र कपिलेश्वर धाम येथे रविवारी दुपारी साडेतीन ते साडेपाच दरम्यान प्रवचन होणार आहे.
नांदेड जिल्ह्यातील कपिलेश्वर धाम येथे प्रसिद्ध महादेव मंदिर आहे. गोदावरी काठावरील या तीर्थक्षेत्राला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे
कपिल महामुनींच्या तपस्थलीला महाशिवरात्रीला शिव आराधना करून आपलं पूर्ण वर्ष मंगलमय करण्यासाठी वे.शा.सं आचार्य श्री प्रणव शास्त्री धानोरकर गुरुजी यांच्या प्रवचनाचा लाभ घ्यावा असे आवाहन शेवडी बाजीराव, सांगवी, भेंडेगाव, धानोरा मोत्या, पेनुर पंचक्रोशीतील भाविक भक्तांनी केले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून वेदमूर्ती प्रणव शास्त्री धानोरकर महाराज आपल्या मराठी आणि हिंदी कथा व कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचे कार्य करीत आहेत.
श्रीक्षेत्र कपिलेश्वर धाम येथील त्यांच्या प्रवचनाचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

COMMENTS