नांदेड - राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात मराठवाडा श...
नांदेड - राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात मराठवाडा शिक्षक संघाने पाठिंबा देऊन सक्रिय सहभाग नोंदवला आहे. सर्वांना जुनी पेन्शन योजना लागू करा, दि. 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी विनाअनुदान, अंशता अनुदानावर नियुक्त तसेच 2005 नंतर 100% अनुदानावर आलेल्या शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तसेच वस्तीशाळा शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करा, चतुर्थ श्रेणी कर्मचारी व वाहन चालक भरतीवरील बंदी तात्काळ उठवा, 10:20:30 वर्षाच्या सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ शिक्षक- शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना लागू करा, सर्व सरकारी कर्मचारी/ निवृत्ती वेतनधारक/ कंत्राटी रोजंदारी कर्मचारी यांना सर्व महत्त्वाच्या इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावे त्यासाठी व्यापक स्वास्थ विमा योजना लागू करावी, सेवानिवृत्तीचे वय 60 वर्षे करा, प्रतीक्षा यादीतील सर्व पात्र उमेदवारांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती द्या, सर्व संवर्गातील रिक्त पदे भरण्यासंदर्भातील कार्यवाहीचा वेग वाढवावा, चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना नियुक्ती देण्यासंदर्भातील 1981 च्या शासन निर्णयाची पूर्ण स्थापना करा, शिक्षकांचे जीवन उध्वस्त करणारा 15 मार्च 2024 चा संच मान्यतेचा शासन आदेश बाबत पुन्हा विचार करण्यात यावा, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा पुनर्विचार करा. याससह इतर मागण्यासाठी आयोजित केलेल्या धरणे आंदोलनात मराठवाडा शिक्षक संघाचे विभागीय अध्यक्ष - सूर्यकांत विश्वासराव, जिल्हाध्यक्ष -व्यंकटराव चिलवरवार, शहराध्यक्ष डी बी नाईक, उपाध्यक्ष अब्दुल हसीब, तालुका अध्यक्ष अतनूरकर, तालुका सचिव,बाबाराव घाटे, अर्धापूर तालुका सचिव- माधव कांजाळकर, शेख समीर,शेख अहमद यांच्यासह अनेक पदाधिकारी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS