माहूर : माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थान येथे दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दानपेट्यांची नियमानुसार मोजणी करण्यात आली. दि. १ जानेवारी ते ...
माहूर : माहूर गडावरील श्री रेणुकादेवी संस्थान येथे दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी दानपेट्यांची नियमानुसार मोजणी करण्यात आली. दि. १ जानेवारी ते ११ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पावती, ऑनलाईन व इतर माध्यमांतून मिळालेली एकूण देणगी ८८ लाख ०७ हजार २७८ रुपये इतकी झाल्याची माहिती संस्थानचे कोषाध्यक्ष तथा तहसीलदार अभिजीत जगताप यांनी दिली.श्रींच्या सभामंडपातील दानपेटीत सर्वाधिक १० लाख ४९ हजार ८३० रुपये जमा झाले. दुसऱ्या दानपेटीत २ लाख ४० हजार ७४१ रुपये, तर दानपेटी उघडणीतील रक्कम ७ लाख ९० हजार ५०० रुपये इतकी होती.
महालक्ष्मी माता मंदिरात १९ हजार ९७७ रुपये, तुळजाभवानी माता मंदिरात ५५ हजार ०७० रुपये, तसेच मंदिर परिसरातील दानपेटीत १ लाख ४१ हजार २०२ रुपये जमा झाले. परशुराम मंदिरात ५७ हजार ९५३ रुपये, परशुराम पाळण्यात २५ हजार ३९७ रुपये, अन्नदान विभागात २५ हजार ३३३ रुपये, तर चिंतामणी परिसरात २१ हजार ५०६ रुपये इतकी देणगी भाविकांनी अर्पण केली.यावेळी दानपेटीतून ७८ ग्रॅम ६५० मिली सोने तसेच विविध स्वरूपातील चांदीचे दागिनेही प्राप्त झाले.
रेणुकामातेच्या दर्शनासाठी राज्यासह परराज्यातून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहत असून, वाढती देणगी ही भक्तांच्या अढळ श्रद्धेचे प्रतीक मानली जात आहे.
## सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले असताना भरभरून दान##
सोन्या-चांदीचे दर वाढलेले असतानाही भाविकांनी उदंड श्रद्धेने सुवर्ण व रौप्य दागिन्यांचे दान केले आहे. दानपेटीतून ७८ ग्रॅम ६५० मिली सोने, तर काउंटरवर १८ ग्रॅम ६० मिली सोने प्राप्त झाले. तसेच नथा २२ नग मिळून एकूण सुमारे ९७ ग्रॅम १९९ मिली सोने अर्पण करण्यात आले.
चांदीबाबत दानपेटीतून १ किलो ७६२ ग्रॅम, तर काउंटरवर १ किलो ५४९ ग्रॅम ३९० मिली चांदी मिळून एकूण ३ किलो ३११ ग्रॅम इतकी चांदी रेणुकामातेच्या चरणी अर्पण करण्यात आली.विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्यात नाताळ सुट्ट्यांमुळे भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. त्या महिन्यात तब्बल १ कोटी १४ लाख २० हजार रुपये देणगी जमा झाली होती. त्यामध्ये १११ ग्रॅम सोने व ४११ ग्रॅम ७०० मिली चांदी प्राप्त झाली होती.

COMMENTS