मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथील जि.प केंद्र प्राथमिक शाळा येथे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिम...
मुखेड (विठ्ठल कल्याणपाड) मुखेड तालुक्यातील आंबुलगा (बु) येथील जि.प केंद्र प्राथमिक शाळा येथे प्रति वर्षाप्रमाणे यंदाही प्रजासत्ताक दिनानिमित्त (दि .९ )रोजी जि .प .केंद्र प्राथमिक शाळेच्या मैदानावर सायंकाळी ७ वाजता सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी सर्वप्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष माधव देशटवाड हे होते, तर प्रमुख उपस्थिती
शिक्षण विस्तार अधिकारी तथा केंद्र प्रमुख नागनाथ द्याडे सर, गिरी सर केंद्र प्रमुख पाळा, व्ही.एस.पाटील सेवानिवृत्त केंद्र प्रमुख, जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका सौ.बिचकुंदे मॅडम, श्री.सुधाकर मामीलवाड सर मुख्याध्यापक शांती निकेतन विद्यालय आंबुलगा बु., श्री.नागनाथ पुष्पलवार सर,श्री.श्रीधर पाटील सर,सौ.संगीता पाटील मॅडम, सौ.पुष्पलता गोरे मॅडम, श्री.भोसले तानाजी सर, श्री. शिवाजी राठोड सर, विशेष शिक्षक नागमपल्ले सर, अंबुलगा (बु ) ग्रामपंचायत सरपंच (प्र) बालाजी रॅपनवाड, उपसरपंच शरद पाटील, सर्व ग्रामपंचायत सदस्य व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माधव देशटवाड, उपाध्यक्ष शिवाजी पांढरे, माजी सरपंच मारोतीराव कलेटवाड, शिक्षण प्रेमी बालाजी कलेटवाड, व्हा. चेअरमन रमेश देशटवाड व सर्व शालेय समिती सदस्य, गावातील सर्व प्रतिष्ठित मान्यवर यांची होती. जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम नर्त्य मंत्रमुग्ध करणारे नाट्य सादर केले .या सांस्कृतिक कार्यक्रमात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, देशभक्तीपर गीत नर्त्य , जनजागृती , बालविवाह प्रतिबंध , मुलगा - मुलगी भेदभाव , विविध सामाजिक शैक्षणिक संदेश या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून देण्यात आला. हा सांस्कृतिक कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी एक महिन्यांपासून आंबुलगा जि. परिषद केंद्र प्राथमिक शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका यांनी अतोनात परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स.शिक्षक तानाजी भोसले सरांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. प्रयागबाई बिचकुंदे मॅडम यांनी केले .यावेळी गावातील महिला पुरुष , विद्यार्थी समवेत सहकुटुंब नागरिकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.

COMMENTS