बिलोली प्रतिनिधी बिलोली शहराच्या प्रलंबित विकासकामा संदर्भात मंत्रालयात पाठपुरावा करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार न...
बिलोली प्रतिनिधी बिलोली शहराच्या प्रलंबित विकासकामा संदर्भात मंत्रालयात पाठपुरावा करून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर यांनी बिलोली नगर परिषदेत सदिच्छा भेटी दरम्यान दिली आहे.
बिलोली तालुक्याचे भूमिपुत्र व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांचे खाजगी सचिव बालाजी पाटील खतगावकर हे कांही खाजगी कामानिमित्त बिलोली तालुक्यात आले असता त्यांनी नगर परिषदेस सदिच्छा भेट दिली. नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी यांनी शहराच्या विविध विकासकामा संदर्भात चर्चा केली असता खतगावकर यांनी विकासकामा संबंधित प्रशासकीय कामाचा पाठपुरावा करून शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही दिली. यावेळी बिलोली नगर परिषदेचे नगराध्यक्ष संतोष कुलकर्णी, उप नगराध्यक्ष अनुप अंकुशकर, व अनेक या वेळी नगर सेवक अनेक जण उपस्थित होते.

COMMENTS