प्रतिनिधी नांदेड दिनांक 23 फेब्रुवारी 2026 सायन्स कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्य...
प्रतिनिधी नांदेड दिनांक 23 फेब्रुवारी 2026 सायन्स कॉलेजमध्ये संत गाडगेबाबा यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. सर्वप्रथम संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले, सभागृहात उपस्थितांनी गाडगेबाबांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना सायन्स महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व शिवाजी जुनिअर कॉलेज चे प्रा शिवानंद सोनटक्के यांनी आपले विचार मांडतांना म्हणाले की देव माणसात आहे हा महनीय विचार ज्या महामानवाने केवळ मांडला नाही तर आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखवला. रंजल्या गांजल्यांची नित्यसेवा आणि स्वच्छता हीच खरी भक्ती असा त्यांचा ठाम विश्वास आणि शाळा वस्तीगृह रुग्णालयांची उभारणी करून समाज प्रबोधन केले असे संत गाडगेबाबा. दुसरे प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना
डॉ विशाल मराठे यांनी संत गाडगेबाबा वर विचार मांडताना दगडात देव मानू नये, गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जनसमुदायास एकत्र करून समाज प्रबोधन केले. प्राणीमात्रावर दया करणे हा मंत्र त्यांनी शिकविला व समाजात परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य संत गाडगेबाबा यांनी केले. अध्यक्षीय समारोप करतांना प्रा ई एम खिल्लारे यांनी संत गाडगेबाबा वर विचार मांडले की खर्चू नका देवासाठी पैसा, शिक्षणाला पैसा तोच द्या हो, नको मंदिराची करावया भर, छात्र जो हुशार त्यास द्यावा व आजच्या शिक्षण पद्धतीवर त्यांनी भाष्य केले. महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो डॉ एल पी शिंदे यांनी संत गाडगेबाबांचे विचार जे आहेत त्याप्रमाणे महाविद्यालयात कृतीतून कार्य करून दाखवण्याचे प्रयत्न चालू आहे आणि ते साध्य होत आहे यास महत्त्व दिले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमाची प्रस्तावना उपप्राचार्य व रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रो डॉ सौ अरुणा राजेंद्र शुक्ला यांनी केले. प्रस्तावनेत बोलतांना संत गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असत. व्यसनाधीनता आणि जातीभेदांवर टीका करत असत समाज घडविण्याचे कार्य संत गाडगेबाबा यांच्या हातून झाले शिक्षण व स्वच्छतेला जीवनामध्ये महत्त्व दिले सेवा हीच ईश्वर पूजा हा विचार संत गाडगेबाबांनी रुजविला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा एन जे अंबरखाने यांनी केले. कार्यक्रमात विशेष उपस्थिती रवींद्र लकडे, प्रा धीरबसी, प्रा कार्तिक जाधव, प्रा सीमा पांडे, शुभांगी नीलवर्ण, प्रतीक्षा सुर्वे, संदीप पाईकराव, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांमध्ये रजिस्ट्रार गौतम वाघमारे, अर्चना कुलकर्णी, संतोष पांडे, केशव गंगासागरे व महाविद्यालयीन विद्यार्थी कार्यक्रमात उपस्थित होते.

COMMENTS