मुखेड (विठ्ठल कल्याणपाड)
मुखेड तालुक्यात दिनांक 23 रोजी सोमवारी अवकाळी पावसाचा मोठा तडाखा बसला विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. यामुळे कापणीला आलेल्या पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे विशेषतः गहू, हरभरा, ज्वारी, करडी, रब्बी , कांदा पिकांवर याचा परिणाम झाला आहे.
नांदेड जिल्हासह संपूर्ण मुखेड तालुक्यात सोमवारी वादळी वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. मुखेड शहरासह तालुक्यातील सर्व महसुल मंडळात विजेच्या कडकडासह अवकाळी पाऊस झाला. मुळात रविवारी मध्यरात्री पासूनच पावसाने हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी सायंकाळच्या सुमारास पुन्हा वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. यामुळे हवेत गारवा निर्माण झाला आहे. संपूर्ण रब्बी पिके जमीन सपाट झाले असून काढणीस आलेले पीकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेले रब्बी पीक अवकाळी पावसामुळे नुकसान झाले त्यामुळं झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे.

COMMENTS