महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेच्या अयोध्येतील अधिवेशनात त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय..

नरेंद्र येरावार   उमरी   महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे चौथे अधिवेशन उत्तर प्रदेशातील श्रीक्षेत्र अयोध्येत समाजभूषण तथा माजी मंत्री आमदार सु...

नरेंद्र येरावार   उमरी  

महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे चौथे अधिवेशन उत्तर प्रदेशातील श्रीक्षेत्र अयोध्येत समाजभूषण तथा माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मनगंटीवार, आमदार समीरभाऊ कुणावार, महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई, काशी अन्नसत्रम चे विलास बच्चू, दिलीप कंदकुर्ते, नंदकुमार मडगुलवार, सदानंद मेडेवार, अनिल मनाठकर, प्रदिप कोकडवार, विपीन गादेवार यांच्यासह विविध मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत व राज्यातील असंख्य समाज बांधवांच्या साक्षीने मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या अधिवेशनात त्रिसूत्री कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला  या त्रिसूत्री कार्यक्रमात समाज बांधवांसाठी घरकुल योजना अंमलात आणणे, अयोध्या येथे भक्त निवास बांधकाम करणे, प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र स्थापन करणे  हे तीन ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. घरकुल योजनेसाठी महासभेचे नागपूर जिल्हाध्यक्ष दीपकभाऊ निलावार यांची प्रोजेक्ट चेअरमन (प्रमुख) म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली असून त्यांना सहाय्य करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यातून या कामासाठी जिल्हा कार्यकारी मंडळाकडून शिफारस केलेल्या समाज बांधवांची समन्वयक म्हणून निवड करण्यात येईल अयोध्या येथे भक्त निवास बांधकामासाठी शिरीष मनाठकर यांची निवड करण्यात आली असून समन्वयक म्हणून राजू नळदकर, अमोल फुटाणे, ज्ञानेश्वर अय्या, विलास कोडगिरे यांची निवड करण्यात आली  प्रत्येक जिल्ह्यात अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करण्यासाठी अमरावती जिल्हाध्यक्षा जयाताई चिंतावार, सोलापूर जिल्हाध्यक्षा सुषमाताई कोडगिरी यांना प्रमुख करण्यात आले असून समन्वयक म्हणून प्रा  डॉ  अनिल मुगटकर, प्रा  डॉ  श्रीनिवास ओमनवार, सुनील डुबेवार यांची निवड करण्यात आली असून उर्वरित समन्वयक जिल्हा कार्यकारिणी मंडळाकडून शिफारस केलेल्या समाज बांधवांची निवड करण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला  हा त्रिसूत्री कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व जिल्हा कार्यकारी मंडळाचे पदाधिकारी सदस्य तसेच सर्व समितीचे पदाधिकारी व सर्व समाज बांधवांनी सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र आर्य वैश्य महासभेचे अध्यक्ष नंदकुमार गादेवार, महासचिव गोविंदराव बिडवई यांनी केले आहे . अधिवेशनात महासभेचे महासचिव गोविंदराव बिडवई यांनी प्रास्ताविक करून महासभेने आतापर्यंत केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि येणाऱ्या काळात महासभा समाजहिताच्या दृष्टिकोनातून कार्य करीत असल्याचे सांगितले महाराष्ट्र आर्य वैश्य महासभा संचलित नियोजित वासवी अर्बन क्रेडिट को ओपरेटिव्ह सोयायटी लि नांदेड चे प्रमाणपञ देण्यात आले  

अयोध्येतील चौथे अधिवेशन यशस्वीरित्या पार पडले असून या अधिवेशनास महाराष्ट्र राज्यातील वीस जिल्ह्यातील पदाधिकारी समाजबांधव उपस्थित होते.

स्वागताध्यक्ष नंदकुमार गादेवार यांनी महासभेच्या यशस्वी कारकीर्दीचा आलेख सादर करून आभार व्यक्त केले. 

COMMENTS

[विशेष न्युज]$hide=post

Loaded All Posts Not found any posts VIEW ALL Read more Reply Cancel reply Delete By Home PAGES POSTS View All RECOMMENDED FOR YOU LABEL ARCHIVE SEARCH ALL POSTS Not found any post match with your request Back Home Sunday Monday Tuesday Wednesday Thursday Friday Saturday Sun Mon Tue Wed Thu Fri Sat January February March April May June July August September October November December Jan Feb Mar Apr May Jun Jul Aug Sep Oct Nov Dec just now 1 minute ago $$1$$ minutes ago 1 hour ago $$1$$ hours ago Yesterday $$1$$ days ago $$1$$ weeks ago more than 5 weeks ago Followers Follow THIS PREMIUM CONTENT IS LOCKED STEP 1: Share to a social network STEP 2: Click the link on your social network Copy All Code Select All Code All codes were copied to your clipboard Can not copy the codes / texts, please press [CTRL]+[C] (or CMD+C with Mac) to copy Table of Content
×
व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा Join Group