नांदेड - नांदेड एज्युकेशन सोसायटी संचलित पीपल्स पूर्वप्राथमिक व प्राथमिक शाळेत राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त भव्य शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण संरक्षण, भौतिकशास्त्र विषयावर आधारित आणि सौर ऊर्जेवर आधारित असे एकूण 120 हून अधिक नाविन्यपूर्ण प्रकल्पांचे सादरीकरण विद्यार्थ्यांकडून करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विज्ञानाचे वेगवेगळे प्रयोग सादर केले. यामध्ये पवनचक्की,ज्वालामुखी,शरीराचे अवयव व त्यांचे कार्य, फळे व पालेभाज्या यांचे आहारातील महत्त्व, वॉटर सायकल, इत्यादी प्रयोग सादर केले.सदर कार्यक्रमाचे उद्घाटन पीपल्स हायस्कूल शालेय समिती अध्यक्ष श्री.नौनिहलसिंगजी जहागिरदार यांच्या हस्ते संपन्न झाला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक प्रशांत चौधरी, राहुल गोरे, संस्कृती विभाग प्रमुख व्ही. आर. चिलवरवार, प्रफुल्लता फुलारी यांची विशेष उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान शिक्षिका पल्लवी जप्पलकर, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका सोनाली केंद्रे यांनी केले. याप्रसंगी बोलताना शालेय समितीचे अध्यक्ष नवनिहाल सिंग जहागीरदार यांनी विज्ञानामुळे देशातील आरोग्य, संरक्षण, तंत्रज्ञान,आरोग्य, शेती अत्यंत विकसित झालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विज्ञानाची कास धरली पाहिजे असे सांगून विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला दाद दिली विद्यार्थ्यांच्या स्मार्ट प्रकल्पांचे विशेष कौतुक केले. मुख्याध्यापक प्रशांत चौधरी यांनी विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन, चिकित्सक वृत्ती आणि नवीन कल्पनांना प्रोत्साहन देणे हा या प्रदर्शनाचा मुख्य उद्देश होता असे सांगून विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. व्ही. आर. चिलवरवार यांनी हे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या भविष्यातील वैज्ञानिक घडणीसाठी एक व्यासपीठ ठरले आहे. असे सांगून सदरील प्रदर्शनाला शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रदर्शनासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री प्रशांत चौधरी,सौ. अनिता गुंडेवार, प्रशांत मार्लेवाड शिक्षकेतर कर्मचारी माधव लुटे, सीमा गुहिलोत यांनी विशेष परिश्रम घेतले. याप्रसंगी विनोद टेकाळे, पेदे, सुरोशे,आडे, पवार, चांडोळकर, हटकर मावशी,संजू माळवदे यांच्यासह शाळेतील शिक्षक शिक्षकेत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS