उमरी : उमरीकर शहरातील मोंढा भागातल्या मुख्य चौरस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच अतिशय मनमोहक भव्य अश्वारूढ पूूतळा उभारण्यात आले आहे.परं...
उमरी :उमरीकर शहरातील मोंढा भागातल्या मुख्य चौरस्त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच अतिशय मनमोहक भव्य अश्वारूढ पूूतळा उभारण्यात आले आहे.परंतु हे स्मारक चोहोबाजूंनी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने,त्या सभोवतालचा रस्ता अरुंद झाला आहे.येणाऱ्या-जाणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत असून,त्यामुळे वारंवार वाहनाचा धक्का लागून स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे नुकसान होत आहे.याबाबत संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून,उपाययोजना करावी व परिसरातील भाजीपाला मंडई इतरत्र हलवण्यााची मागणी सर्व शिवप्रेमींकडून होत आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील मुख्य चौकात उभारण्यात आलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक अतिशय मनमोहक व शहराचे आकर्षक केंद्रबिंदू ठरले आहे.परंतु स्मारकाच्या सभोवतालीचा रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने,अरुंद झाला आहे.शहराच्या मुख्य व्यापारी पेठेतील गजबजलेला हा रस्ता अरुंद झाल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागतो.त्यामुळे वाहनांचा धक्का लागून स्मारकाच्या संरक्षण भिंतीचे वारंवार नुकसान होत आहे.वारंवार होणारे हे नुकसान,शिवप्रेमींच्या मनाला दुखावणारे असल्याने,काही अप्रिय घटना घडण्यापुर्वी प्रशासनाने याबाबत गांभीर्याने घेऊन,अपेक्षित उपाय योजना करून मूख्य रस्त्यावरील होणारी भाजी पाल्याचा लिलाव व किरकोळ विक्री इतर ठिकाणी करावी अशी मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. r

COMMENTS