मुंबई दि.9 : केंद्र सरकारच्या कामगार आणि शेतकरी वि रोधी धोरणाला कडाडून विरोध करण्यासाठी इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (INTUC), सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स(CITU), ऑल इंडिया ट्रेड युनियन (AITUC), हिंद मजदूर सभा (HMS), ऑल इंडिया सेंट्रल कौन्सिल ऑफ ट्रेड युनियन्स (AICCTU),LPF आणि UTCU या केंद्रीय कामगार संघटना कृती समीती आणि शेतकरी संघटनेने 12 फेब्रुवारीला देशव्यापी संपाची हाक दिली आहे
महाराष्ट्रात कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीच्या नेतृत्वाखाली इंटक,आयटक,एच एमएस,सीआयटीयू,एनटीयुआय,भारतीय कामगार सेना,एआय सीसीटीयु,टीयुसीआ य,बीइसीटीयु ,शिक्षक संघटना,एआयबीइए, बीइएफआय,एआय आयइए ,राज्य सरका री कर्मचारी संघटना महासंघ,श्रमिक एकतामंच,कामगार एकता,स्वतंत्र फेडरेशन,इत्यादी जवळपास 20 पेक्षा अधिक संघटना या कृती समितीत सहभागी झाल्या आहेत.
झोपेचे सोंग घेतलेल्या सरकारला जागे करा! -सचिन अहिर_
दरम्यान गुरुवारी पार पडलेल्या,राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाच्या कार्यकारीमध्ये अध्यक्षस्थानावरून बोलतांना येत्या १२ तारखेच्या देशव्यापी संपाला पाठिंबा देताना आमदार सचिनभाऊ अहिर यांनी सांगितले,की कामगार आणि शेतक-यांच्या प्रश्नांवर केंद्र सरकार कठोर,निगरगट्ट मनाचे झाले असून, झोपेचे सोंग घेतलेल्या केंद्र सरकारला आता दिल्ली दरबारी संसदेत खासदारांद्वारे जागे करावे लागेल.मुंबई सह देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील एनटीसीच्या २३ पेक्षा अधिक गिरण्या गेली ५ वर्षे बंद असून कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या उपासमारीला अंत उरलेला नाही.२९ जुने सक्षम कामगार कायदे रद्द करुन,चार कामगार संहिता केंद्र सरकारने लागू केल्या आहेत.त्यामुळे कामगारवर्ग सांपडला आहे.
इंटकचा पाठिंबा!
याप्रश्नावर ३ तारखेला महाराष्ट्र इंटकचे अध्यक्ष डॉ.कैलास कदम, सरचिटणीस गोविंदराव मोहिते,कार्याध्यक्ष निवृत्ती देसाई, कोषाध्यक्ष दिवाकर दळवी,सचिव मुकेश तिगोटे,जी.बी.गावडे,बजरंग चव्हाण आणि अन्य प्रमुख पदाधिकाऱ्यांची नुकतीच तांतडीची ऑनलाइन झुम मिटिंग पार पडली.इंटक प्रणित सर्व कारखान्यातील कामगारांनी केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाचा कडाडून निषेध करण्याचा निर्धार केला आहे.
कामगार आयुक्त कार्यालयावर प्रचंड निदर्शने!
महाराष्ट्रात एकत्र आलेल्या सर्व श्रमिक संघटनांच्या कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने ,१२ फेब्रुवारीच्या देशव्यापी संपात प्रचंड ताकदीनीशी उतरली आहे.या दिवशी संध्याकाळी 3 वाजता वांद्रे येथील कामगार संयुक्त कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे.या आंदोलनात महाराष्ट्र इंटकच्या नेतृत्वाखाली असंख्य कारखान्यातील कामगार,राष्ट्रीय मिल मजदूर संघ,महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघ,तसेच अन्य संघटनांच्या कारखान्यातील कामगार, गिरणी कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
कामगार संघटनांनी 100 वर्षाच्या लढ्यातून मिळविलेले कामगार हिताचे २९ कायदे, विद्यमान केंद्र सरकारने रद्द करून, चार कामगार संहिता लागू केल्या आणि कामगार वर्गाचे भविष्यच अंधारात आणले आहे,असे महाराष्ट्र इंटेकचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी देशव्यापी संपाला पाठिंबा देताना म्हटले आहे. त्याशिवाय केंद्र सरकारची नवी श्रमशक्ती निती मनुवादी आहे.शासनाने याचा पहिला प्रयोग संसदेत मंजूर केलेल्या चार कामगार संहितेतून केला आहे. सरकारने जाहीर केलेल्या श्रमशक्ती निती मागे शासनाची कूट निती जबाबदार आहे.मनुवादी संस्कृती जन्माला घालून कामगार वर्गाला गुलाम बनविण्याचा डाव सरकारने रचला आहे!
राज्य सरकारने जनसुरक्षा कायदा आणि कामाचे तास वाढवून, कामगार वर्गाला पुन्हा गुलामगिरीकडे नेण्याचा डाव रचला आहे,असे महाराष्ट्र इंटेकचे अध्यक्ष डॉ. कैलास कदम यांनी राज्य व केंद्राच्या कामगार विरोधी धोरणाला कडाडून विरोध करताना देशव्यापी संपला पाठिंबा दिला आहे.
देशव्यापी संपात बॅंका,शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, अंगणवाडी सेविका,परिचारिका,फेरीवाले,घरेलू कामगार,कंत्राटी कामगार,बस,रिक्षा,टॅक्सी,असंघटित कामगार आदी विविध श्रेत्रातील अन्यायग्रस्त कामगार मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत,असे महाराष्ट्र कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीने म्हटले आहे.*

COMMENTS