बीड | २० फेब्रुवारी २०२६ सॉलंसी प्रमाणपत्र (ऐपतदार प्रमाणपत्र) देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी परळी वैजनाथचे तहसीलदार व्यंक...
बीड | २० फेब्रुवारी २०२६ सॉलंसी प्रमाणपत्र (ऐपतदार प्रमाणपत्र) देण्यासाठी २० हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी परळी वैजनाथचे तहसीलदार व्यंकटेश बाबुराव मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) कारवाई केली आहे. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.काय आहे संपूर्ण प्रकरण?
तक्रारदाराला कोर्टाच्या जामिनासाठी ७ लाख रुपयांचे सॉलंसी प्रमाणपत्र हवे होते. त्यासाठी त्यांनी तहसील कार्यालय, परळी येथे अर्ज केला होता. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी ५० हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. मात्र, तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी ११ फेब्रुवारी २०२६ रोजी एसीबी बीडकडे तक्रार नोंदवली.
तडजोडीचा 'चिठ्ठी' ड्रामा
एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता धक्कादायक प्रकार समोर आला. तहसीलदार मुंडे यांनी तक्रारदाराशी चर्चा करताना थेट बोलणे टाळून एका चिठ्ठीवर '५०' असा आकडा लिहून लाचेची मागणी केली. तक्रारदाराने रक्कम कमी करण्याची विनंती केल्यावर मुंडे यांनी चिठ्ठीवर '२५' हा आकडा लिहिला. अखेर २० हजार रुपयांवर तडजोड झाली. मात्र, मुंडे यांनी जाता-जाता "आणखी ३ टाका" असे म्हणत २३ हजारांचा आग्रह धरला होता, पण शेवटी २० हजार रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.
तीन वेळा हुलकावणी, अखेर ताब्यात
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ११, १६ आणि १७ फेब्रुवारी रोजी सापळा रचला होता. मात्र, प्रत्येक वेळी संशय आल्याने किंवा अन्य कारणांमुळे मुंडे यांनी लाचेची रक्कम स्वीकारली नाही. १७ फेब्रुवारी रोजी तर तक्रारदाराने "पाकीट द्यायचे आहे" असे म्हटल्यावर मुंडे काहीही न बोलता शासकीय वाहनात बसून निघून गेले.
जरी प्रत्यक्ष रक्कम स्वीकारली नसली, तरी पडताळणी दरम्यान लाचेची मागणी सिद्ध झाल्याने आणि तक्रारदाराने दिलेल्या पुराव्यांच्या आधारे, एसीबीने आज २० फेब्रुवारी रोजी मुंडे यांना ताब्यात घेतले.
कारवाईचा तपशील
आरोपी: व्यंकटेश बाबुराव मुंडे (वय ४७, वर्ग-१ अधिकारी).
जप्त मुद्देमाल: आरोपीच्या अंगझडतीत ५० हजार रुपये किमतीचा ॲपल आणि ३० हजार रुपये किमतीचा सॅमसंग असे दोन मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
पुढील तपास: सध्या आरोपीच्या घराची झडती (House Search) सुरू असून अटकेची प्रक्रिया सुरू आहे.
तपास पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, छत्रपती संभाजीनगरच्या पोलीस अधीक्षक श्रीमती माधुरी केदार कांगणे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. शशिकांत शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले, पोलीस निरीक्षक समाधान कवडे आणि त्यांच्या पथकाने केली आहे.

COMMENTS